Fact Check : पाकिस्तानला काश्मीर नको तर आता हवाय विराट?

Fact Check : पाकिस्तानला काश्मीर नको तर आता हवाय विराट?

भारताविरुद्ध मिळालेल्या पराभवाचा पाकिस्तानमध्ये एवढा संताप आहे की, चाहत्यांनी संघ आणि प्रशिक्षिक यांच्यावर बॅन लावावा म्हणून कोर्टात याचिका जारी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जून : ICC Cricket world cup 2019मध्ये भारतानं पाकिस्तानला नमवलं. तबब्ल सातव्यांदा भारतीय संघानं पाकिस्तानला धुळ चारली. यामुळं पाकिस्तानचं चाहते आपल्या संघावर चांगलेच तापले आहेत. एवढच नाही तर, चाहत्यांनी पाकच्या खेळाडूंची धुलाी केली. ट्विटरवर भारतीय चाहत्यांचे मिम्स तर, पाक चाहत्याचा रोष सध्या ट्रेण्ड होत आहे. यातच, इब्र सिना नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून हा फोटो सोशल मीडियावर खुप जास्त शेअर केला जात आहे. या फोटोमध्ये पाकिस्तानी तरुण आपल्या हातात पाकिस्तानचा झेंडा घेत एक बॅनर घेऊन उभे आहेत. या बॅनरवर, "हमें कश्मीर नहीं चाहिए, हमें विराट कोहली चाहिए', असे लिहिले आहे. तरुणांनी आम्हाला काश्मिर नको तर, विराट कोहली हवा अशी मागणी पाकिस्ताननं सामना गमावल्यानंतर केली असल्याचे इब्र सिना याने म्हटले आहे.

मात्र, Fact Check केल्यास हा फोटो खोटा असल्याचे समोर आले आहे. या फोटोचा वापर याआधीही अनेकवेळा करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करणाऱ्या तरुणाच्या बायोमध्ये 'मेरा धर्म हिंदु है पर कल्चर हिंदु है', असे लिहण्यात आले आहे. मात्र न्यूज18नं केलेल्या रिसर्चनुसार हा फोटो पाकिस्तानचा नसून काश्मिरचा आहे. 2016 साली बुरहान वानी या तरुणाच्या मृत्यूनंतर हा फोटो व्हायरल झाला होता. दरम्यान हा फोटो फोटोशॉप करून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. हा फोटोमध्ये अनेकवेळा छेडछाड करण्यात आली आहे.

चाहत्यांची कोर्टात याचिका

दरम्यान भारताविरुद्ध मिळालेल्या पराभवाचा पाकिस्तानमध्ये एवढा संताप आहे की, चाहत्यांनी संघ आणि प्रशिक्षिक यांच्यावर बॅन लावावा म्हणून कोर्टात याचिका जारी केली आहे. पाकिस्ताननं 89 धावांनी हा सामना गमावला. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज खान याच्यावर नाणेफेक जिंकत घेतलेला गोलंदाजीचा निर्णय चूकीचा असल्याचा आरोप करण्यात आला होता. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यानं तर सर्फराजला बिनडोक म्हटले होते.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं

First published: June 19, 2019, 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading