World Cup : गरम गरम शेंगा, चटकदार भेळ विकताहेत इंग्रज, पाहा VIDEO

World Cup : गरम गरम शेंगा, चटकदार भेळ विकताहेत इंग्रज, पाहा VIDEO

इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान भाजलेल्या शेंगा आणि चटकदार भेळसुद्धा भारतीयांना खायला मिळत आहे.

  • Share this:

लंडन, 11 जून : भाजलेल्या शेंगा आणि चटकदार भेळ खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. या अशा गोष्टी आहेत की परदेशात गेल्यावर भारतीय लोकांना याची आठवण येते. सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचा महासंग्राम रंगला आहे. वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी आणि फिरणासाठी गेलेल्या लोकांना आता या दोन्ही गोष्टी इंग्लंडच्या रस्त्यावर खायला मिळत आहेत.

कुमार विश्वास यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक परदेशी व्यक्ती भाजलेल्या शेंगा विकताना दिसत आहे. कुमार विश्वास यांनी शेंगा विकणाऱ्याला हे काय आहे असं विचारलं. त्यावर त्याने गरम गरम मूंगफली असं उत्तर दिलं.

शेंगा विकत असलेल्या व्हिडिओशिवाय आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. त्यात एक व्यक्ती लंड़नच्या ओव्हल मैदानाबाहेर भेळ विकताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या जास्त आहे.

भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने उद्घाटन समारंभावेळी म्हटलं होतं की, इंग्लंडमध्ये भारीतय चाहते भरपूर आहेत. त्यामुळे इथं घरच्या मैदानावर खेळल्यासारखं वाटेल.

भारताने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आता तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका बसला असून भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे ३ आठवडे खेळू शकणार नाही.  शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलु खेळाडू मार्कस स्टोइनिससुद्धा दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी टॉटनच्या काउंटी ग्राउंडवर सामना होणार आहे. त्यानंतर पाकिस्तानचा सामना भारताशी 16 जूनला रविवारी होणार आहे.

वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर

वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

First published: June 11, 2019, 7:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading