इंग्लंडचे दोन विश्विक्रम, पाकविरुद्ध 4-0 ने मालिका विजय

पाकिस्तानविरुद्ध मालिका विजयासह इंग्लंडने भारताचा दहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

  • Share this:

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या अगोदर होत असलेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत इंग्लंडने 4-0 ने विजय साजरा केला. मालिकेतील पाचवा सामना 54 धावांनी जिंकला. या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या मालिकेत धावांचाही पाऊस पडला.

पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील 4 सामन्यात इंग्लंडने 373, 359, 341 आणि 351 धावा केल्या. सलग 4 सामन्यात 340 पेक्षा जास्त धावा करणारा इंग्लंड हा जगातील पहिला संघ आहे.

इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या या मालिके चार सामन्यात जवळपास 1 हजार 424 धावा केल्या. एका मालिकेत कोणत्याही संघाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. इंग्लंडने भारताचा 10 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला.

भारताने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एका मालिकेत 1 हजार 275 धावा केल्या होत्या. इंग्लंडने भारतापेक्षा 149 धावा काढून हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

दोन विश्व विक्रमांशिवाय इंग्लंडने आणखी एक कामगिरी केली आहे. गेल्या 11 द्विपक्षीय एकदिवसीय मालिकांमध्ये 10 वेळा विजय मिळवला आहे तर एक मालिका बरोबरीत सुटली आहे. यामुळे वर्ल्ड कपमध्ये त्यांना प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पुढे वाचा... 2 महिन्याच्या मुलीसाठी तो रात्रभर रुग्णालयात जागला, सकाळी पाकविरुद्ध केलं शतक

इंग्लंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर जेसन रॉयच्या शतकी खेळीच्या जोरावर चौथ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्याची शतकी खेळी कौतुकाचा विषय असताना मैदानावर खेळणाऱ्या जेसनचे लक्ष मात्र रुग्णालयात असलेल्या त्याच्या 2 महिन्याच्या चिमुकलीकडे लागून राहिले होते.

सामन्यानंतर जेसन रॉय म्हणाला की 114 धावा जरी केल्या असल्या तरी त्या म्हणाव्या तितक्या वेगाने झाल्या नाही. ही खेळी आयुष्यभर विसरणार नाही अशीच होती. कारण या खेळीपूर्वी त्याला 7 तास रुग्णालयात थांबावं लागलं होतं. त्यानंतर केवळ दोन तासांची विश्रांती घेऊन जेसन रॉय मैदानावर पोहचला होता.

जेसनची मुलगी इवरली फक्त दोन महिन्यांची आहे. गुरुवारी रात्री उशिरा तिची तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यावेळी जेसन आणि त्याची पत्नी दोघेही मुलीला घेऊन रुग्णालयात गेले. तिथं त्यांना रात्रभऱ थांबावं लागलं. शेवटी सकाळी डॉक्टरांनी मुलीची तब्येत धोक्याबाहेर असल्याचं सांगितल्यानंतर जेसन घरी परतला.

सकाळी घरी त्याने दोन तास विश्रांती घेतली आणि सामन्याच्या काही मिनिटे आधी मैदानावर पोहचला. यात त्याने 114 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. जेसनच्या क्रिकेट कारकिर्दीतील हे आठवं शतक आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने 2015 मध्ये पहिलं शतक केलं होतं.

जेसन म्हणाला की, माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हे शतक खुप महत्त्वाचं आहे. माझी सकाळ चांगली नव्हती. मुलीची तब्येत ठीक नसल्यानं रुग्णालयात जावं लागलं. त्यानंतर अर्धवट झोप घेऊन मैदानावर क्षेत्ररक्षण केल्यानंतर फलंदाजी करणं थोडं कठीण होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 10:22 AM IST

ताज्या बातम्या