World Cup : रूटचं असं सेलिब्रेशन, याच स्टाईलनं पोहचले होते 1992 च्या फायनलला!

World Cup : रूटचं असं सेलिब्रेशन, याच स्टाईलनं पोहचले होते 1992 च्या फायनलला!

ICC Cricket World Cup 2019 : west indies vs england : जो रूटने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वैयक्तिक दुसरं शतक झळकावलं आहे. त्याचबरोबर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन गडी बाद करत इंग्लंडच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

  • Share this:

साउथॅम्पटन, 14 जून : वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्याच्या या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली ती जो रूटने. त्याने गोलंदाजीत दोन फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर फलंदाजी करताना शतकी खेळी केली. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजच्या फलंदाजीवेळी जो रूटने स्वत:च्या गोलंदाजीवर झेल घेत दोन गडी बाद केले. त्याने शिम्रॉन हेटमायर आणि जेसन होल्डरला तंबूत पाठवलं. त्यावेळी त्याने दोन्ही हातांनी ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं त्यामुळे इंग्लंडच्याच एका कर्णधाराची आठवण आली. 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये इयॉन बॉथमनेसुद्धा अशाच प्रकारे विकेट मिळाल्यावर सेलिब्रेशन केलं होतं.

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लडला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांना पहिल्या जेतेपदाच्या इतक्या जवळ जाऊनही ते मिळवता आलं नव्हतं. अंतिम सामन्यात इयॉन बॉथमने 7 षटकांत 42 धावा देत 1 गडी बाद केला होता. मात्र, एकही धाव काढता आली नव्हती. पाकिस्तानने हा सामना 22 धावांनी जिंकून विजेतेपदावर नाव कोरलं होतं. त्या वर्ल्ड कपमध्ये इय़ॉन बॉथमने फलंदाजी 192 धावा आणि गोलंदाजीत 16 विकेट घेतल्या होत्या.ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला 212 धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दोन गड्याच्या मोबदल्यात 213 धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो 45 धावा करून बाद झाला. त्याने जो रूटसोबत 95 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रूटने वोक्ससोबत 104 धावांची भागिदारी केली. वोक्स उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर रूटने यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसऱे शतक साजरं करताना संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. इंग्लंडचा हा तिसरा विजय आहे.तत्पूर्वी, वेस्ट इंडिज यांच्यात धावांचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, वेस्ट इंडिजला इंग्लंडने 212 धावांत गुंडाळले. सलामीवीर ख्रिस गेलला फक्त 36 धावा करता आल्या. त्यानंतर निकोलस पूरनने अर्धशतकी खेळी केली. पूरनला जोफ्रा आर्चरने जोस बटलरकरवी झेलबाद केलं. त्याने 63 धावा केल्या. गेल आणि पूरनशिवाय शिम्रॉन हेटमायरने 39 धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी तीन तर जो रूटने 2 गडी बाद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 10:21 PM IST

ताज्या बातम्या