ENG vs WI : जो रूटची अष्टपैलू खेळी, इंग्लंडचा विंडीजवर दणदणीत विजय

ENG vs WI : जो रूटची अष्टपैलू खेळी, इंग्लंडचा विंडीजवर दणदणीत विजय

ICC Cricket World Cup : इंग्लंडच्या जो रूटने गोलंदाजी करताना दोन गडी बाद केले त्यानंतर फलंदाजीतही जबरदस्त कामगिरी करत शतकी खेळी केली.

  • Share this:

साउथैम्पटन, 14 जून : ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला 212 धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दोन गड्याच्या मोबदल्यात 213 धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो 45 धावा करून बाद झाला. त्याने जो रूटसोबत 95 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रूटने वोक्ससोबत 104 धावांची भागिदारी केली. वोक्स उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर रूटने यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसऱे शतक साजरं करताना संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. इंग्लंडचा हा तिसरा विजय आहे.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिज यांच्यात धावांचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, वेस्ट इंडिजला इंग्लंडने 212 धावांत गुंडाळले. सलामीवीर ख्रिस गेलला फक्त 36 धावा करता आल्या. त्यानंतर निकोलस पूरनने अर्धशतकी खेळी केली. पूरनला जोफ्रा आर्चरने जोस बटलरकरवी झेलबाद केलं. त्याने 63

धावा केल्या. गेल आणि पूरनशिवाय शिम्रॉन हेटमायरने 39 धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी तीन तर जो रूटने 2 गडी बाद केले.

गेल्या काही दिवसांपासून पावसामुळं सामने रद्द होत होते. दरम्यान इंग्लंडनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड संघानं सलग तीनही सामन्यांत सहज तीनशे धावांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळं वेस्टइंडिजला जास्त धावांचे आव्हान द्यावे लागणार आहे. आनंदाची बाजमी म्हणजे, या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता कमी आहे.

यजमान इंग्लंडनं विश्वचषकाच्या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला 104 धावांनी धूळ चारली, तर पाकिस्तानविरुद्ध त्यांना 14 धावांनी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र बांगलादेशविरुद्ध इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन करत 106 धावांनी विजय मिळवला. या विजयाने इंग्लंड गुणतालिकेत चार सामन्यात तीन विजय मिळवून 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहचले.
वाचा- सामना रद्द झाल्याचा गुणतालिकेत विराटसेनेला फटका, न्यूझीलंडचा फायदा

वाचा-World Cup : इंग्लंडमध्ये पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी!

वाचा-ICC च्या नियोजनाचा फटका, World Cup चं स्वप्न राहणार अधुरं!


उदयनराजेंचं तुळजाभवानीला साकडं, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 09:38 PM IST

ताज्या बातम्या