VIDEO : इंग्लंड-पाकचे खेळाडू थ्रो करताना एक टप्पा जास्त टाकायचे, पंचांनी दिली समज

ICC Cricket World Cup 2019 : थ्रो करताना चेंडू एक टप्पा जास्त टाकल्याच्या प्रकारानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांना इशारा दिला.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 10:15 PM IST

VIDEO : इंग्लंड-पाकचे खेळाडू थ्रो करताना एक टप्पा जास्त टाकायचे, पंचांनी दिली समज

ओव्हल, 04 जून : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी चेंडू खराब करण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात पंचांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांना समज दिली. इंग्लंड आणि पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंनी रिव्हर्स स्विंगसाठी चेंडू एका बाजूने झिजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न पंचांच्या लक्षात येताच दोन्ही संघांच्या खेळाडूंना असा प्रकार न करण्याचा इशारा दिला.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यावेळी मैदानावरील पंचांनी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद आणि इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला इशारा दिला. दोन्ही देशाचे खेळाडू आउटफिल्डवरून थ्रो करताना चेंडू एक टप्पा जास्त टाकत होते. याबद्दल मॉर्गनने पंचांशी याबाबत चर्चा झाली आणि खेळाडूंच्या अशा कृतीबद्दल सांगितल्याचंही म्हटलं.

<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">There used to be a time when umpires inspected the ball, nowadays it seems some players think it&#39;s their job to keep checking the condition of the ball <a href="https://twitter.com/hashtag/ENGvPAK?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#ENGvPAK</a> <a href="https://t.co/PVywmE6skD">pic.twitter.com/PVywmE6skD</a></p>&mdash; Saj Sadiq (@Saj_PakPassion) <a href="https://twitter.com/Saj_PakPassion/status/1135875526890053633?ref_src=twsrc%5Etfw">June 4, 2019</a></blockquote>

<script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

सामन्यावेळी दोन्ही संघांच्या गोलंदाजांना जास्त रिव्हर्स स्विंग मिळू शकली नाही पण जोस बटलर बाद झाल्यानंतर पंचांनी चेंडूचं निरिक्षण केलं. पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद हाफीजने सुद्धा पंचांनी असा थ्रो केल्यास दंड केला जाईल हे सांगितल्याचं म्हटलं. तो म्हणाला की, पंचांचे ते काम आहे आणि त्यांनी ते केलं. दोन्ही संघांमध्ये एक दोन वेळा असा प्रकार घड़ला.  आम्हाला 20 षटकानंतर पंचांनी इशारा दिला.

Loading...

वाचा : भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू

आय़सीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने इंग्लंडसमोर 349 धावांचा डोंगर उभारून सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. त्यानंतर इंग्लंडला 334 धावांत रोखून 14 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडकडून जो रूट आणि जोस बटलर यांची शतके संघाला विजय मिळवण्यात अपयशी ठरली.

वाचा : World Cup : भारताचे सामने कधी आणि कोणाविरुद्ध? पाहा संपूर्ण वेळापत्रक


VIDEO : धोनी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 10:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...