बर्मिंगहम, 28 जून : ICC Cricket World Cup मध्ये जेतेपदाचा प्रबळ दावेदार समजले जात असतानाच आता इंग्लंडवर सेमीफायनल गाठण्याचं आव्हान आहे. त्यांची सुरुवात चांगली झाली मात्र लंकेन दिलेल्या दणक्यानं त्यांची वाट कठीण झाली आहे. त्यांचा पुढचा सामना भारताविरुद्ध बर्मिंगहमवर होणार आहे. हा सामना त्यांच्यासाठी करा किंवा मरा असाच असणार आहे. पुढचे दोन्ही सामने त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. दरम्यान संघातील खेळाडूंची मानसिकता नकारात्मक झाली असून एकमेकांत जुंपली आहे.
इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोचं म्हणणं आहे की जगाला इंग्लंडचा पराभव झालेला बघायचा आहे. याचीच वाट सर्वजण बघत आहेत असं बेअरस्टो म्हणाला. त्यावर जोस बटलरने बेअरस्टोच्या मताशी असहमती दर्शवली. त्याने म्हटलं की, इंग्लंडला चांगला पाठिंबा मिळत आहे.
बेअरस्टोने एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, दोन सामन्यात पराभवानंतर इंग्लंडच्या खेळावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकांना इंग्लंड जिंकावं असं वाटत नाही. मात्र आम्ही भारताविरुद्ध पुन्हा चांगला खेळ करू असा विश्वास असल्याचं त्याने सांगितलं. इंग्लंडने भारताला गेल्या वर्षी एकदिवसीय मालिकेत पराभूत केलं होतं.
इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनीसुद्धा बेअरस्टोला फैलावर घेतलं आहे. बेअरस्टो चुकीचा आहे. आतापर्यंत कोणत्याच इंग्लंडच्या संघाला एवढं प्रोत्साहन दिलं नव्हतं पण या संघानेच लोकांना निराश केलं. या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर येऊन पुढचे सामने जिंका आणि सेमीफायनल गाठा असा सल्लाही मायकल वॉन यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत जोस बटलरला बेअरस्टोच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा बेअरस्टोच्या मताशी सहमत नाही. इंग्लंडच्या लोकांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आहे. लोकांचा संघावर विश्वास आहे असंही बटलर म्हणाला.
इंग्लंडला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सेमीफायनल गाठण्याचं आव्हान त्यांच्यासमोर उभा राहिलं आहे.
वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली
वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!
वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!
फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा