World Cup : 50 षटकांत 500 धावा! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला ऐतिहासिक निर्णय

एकदिवसीय सामन्यात 50 षटकांत इंग्लंडने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 6 बाद 481 धावा केल्या होत्या.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 05:44 PM IST

World Cup : 50 षटकांत 500 धावा! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला ऐतिहासिक निर्णय

लंडन, 16 मे : इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये एकदिवसीय सामन्यातील एका डावात 500 धावा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्कोरकार्डमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्कोरकार्डच्या नव्या डिझाइनमध्ये धावांची मर्यादा 500 पर्यंत केली आहे. वर्ल्ड कपच्या आधी होत असलेल्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यांत 350 धावा सहज केल्या जात आहेत. याचा विचार करता क्रिकेट बोर्डाने स्कोरबोर्डवर 500 धावा करण्याचा निर्णय घेतला.

डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेक्षक जे स्कोरकार्ड खरेदी करतात त्यावर धावांची नोंद असते. वर्ल्ड कपच्या आधी 400 धावा असलेली स्कोरकार्ड तयार केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांनी नवीन स्कोरकार्ड करण्याची गरज असल्याचं म्हटलं. इंग्लंड पाकिस्तान यांच्यातील धावा पाहता वर्ल्ड कपमध्ये 50 षटकांत 500 धावासुद्धा होऊ शकतात.

वाचा : धोनीच्या बाद होण्यावर कमेंट करणं 'या' क्रिकेटपटूला ठरतंय त्रासदायक

इंग्लंडमध्ये प्रेक्षकदेखील छापील स्कोरकार्ड खरेदी करू शकतात. आठवण म्हणून प्रेक्षकांकडे तो राहतो. आता या स्कोरकार्डवर 500 धावांपर्यंत नोंद करता येऊ शकते.

Loading...

इंग्लंडने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एखदिवसीय सामन्यात 481 धावा केल्या होत्या. तर सध्या सुरु असलेल्या मालिकेत पाकिस्तानविरुद्ध 3 बाद 373 धावा केल्या होत्या. इंग्लंजमधील खेळपट्टीचा विचार केल्यास 500 धावा होणं कठिण नाही. वर्ल्ड कपमध्ये हा इतिहास होऊ शकतो.

वाचा : IPL 2019 : हरभजनबद्दल धोनीच्या त्या निर्णय़ाने चेन्नईचा पराभव?


VIDEO : बापरे! उपचार सुरू असताना तोंडातच झाला स्फोट, महिला जागीच ठार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...