World Cup : चीटर...चीटर आणि चीटर, प्रेक्षकांनी केला या खेळाडूंचा पाणउतारा

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत चेंडू कुरतडल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोषी आढळले होते.

News18 Lokmat | Updated On: May 26, 2019 12:03 PM IST

World Cup : चीटर...चीटर आणि चीटर, प्रेक्षकांनी केला या खेळाडूंचा पाणउतारा

लंडन, 26 मे : विश्वचषकाला केवळ 4 दिवसांचा कालावधी उरला असताना, सर्व संघ सध्या जय्यत तयारी करित आहेत. यात सध्या सुरु असलेल्या सराव सामन्यात, सर्व संघ आपली तयारी कितपत झाली आहे, त्याची चाचणी करत आहे. मात्र शनिवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सराव सामन्याक एक वाईट प्रसंग पाहायला मिळाला. चाहत्यांनी चक्क ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांचा अपमान केला. दरम्यान याआधीच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आम्हाला चाहत्यांपासून धोका असल्याचे वक्यव्य केले होते.

ऑस्ट्रेलियाचे हे खेळाडू आहेत, स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोषी आढळले होते. त्यानंतर दोघांवरही एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. यावरुन दोघांना लक्ष्य केले जात आहे. या दोघांवरची बंदी 29 मार्चला उठवण्यात आली होती. त्यानंतर आयपीएलमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र शनिवारी झालेल्या विश्वचषकाच्या सराव सामन्यात सलामीला उतरलेल्या वॉर्नरवर चाहत्यांनी टिपण्णी केली. कर्णधार फिंचसोबत फलंदाजीसाठी आलेल्या वॉर्नरला पाहता चाहत्यांनी वॉर्नर, चीटर पळून जा इकडून, असे ओरडून सांगितले. दरम्यान वॉर्नरने याकडे लक्ष दिले नाही. मात्र ते 43 धावा करुन बाद झाला. तेव्हाही काही चाहत्यांनी त्याच्यावर कमेंट केली. त्यानंतर स्मिथ फलंदाजीसाठी आला असताना, चाहत्यांनी चीटर...चीटर...चीटर...असे जोर जोरात ओरडण्यास सुरुवात केली. मात्र याकडे दुर्लक्ष करत, स्मिथनं शतकी खेळी केली.

स्मिथच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 12 धावांनी नमवले. मात्र या प्रकाराबाबत सर्व खेळाडूंना निषेध व्यक्त केला आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी म्हटलं होते की, आपण प्रेक्षकांवर नियंत्रण नाही ठेवू शकत. प्रेक्षकांमुळे वातावरण तणावपूर्ण होऊ शकतं पण त्यासाठी दोघेही तयार आहेत. दोघांनीही गेल्या वर्षभरात खूप सहन केलं आहे आणि यापुढेही ते तयार आहेत, असे मत व्यक्त केले होते.या सराव सामन्यादरम्यान काही चाहते क्रिकेटबॉल तर, काही सॅंडपेपर हातात घेऊन आले होते. दरम्यान याबाबत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी निषेध व्यक्त केला आहे.याआधी इंग्लंडचा गोलंदाज मोईन अली याने इंग्लंडच्या प्रेक्षकांना आवाहन केलं आहे की, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथवर खाजगी टीका करू नका. ऑस्ट्रेलियात मोइन अलीची तुलना दहशतवाद्याशी करण्यात आली होती. 2015 मध्ये अॅशेस मालिकेवेळी त्याला ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ओसामा म्हटलं होतं. त्यावेळी मोइन अलीला राग आला होता.


वाचा-World Cup : भारताच्या 'मिशन' वर्ल्डकपला धक्का, पहिल्याच सामन्यात विराटसेनेचे वस्त्रहरण !

वाचा-World Cup : सामना गमावल्यानंतर विराटसाठी खुशखबर, अखेर चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटणार

वाचा-फक्त खेळाडूच नाही तर 'या' पाच हॉट अ‍ॅंकरही गाजवणार ICC Cricket World Cup

वाचा-अर्जुन तेंडुलकरवर बरसला 'हा' मुंबईकर खेळाडू, 57 चेंडूतच ठोकले शतक


मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना काय दिला सल्ला? या आणि इतर महत्त्वपूर्ण 18 घडामोडी, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...