News18 Lokmat

IPL मधील 'हा' महागडा खेळाडू ऐनवेळी इंग्लंडच्या संघात

इंग्लंडने वर्ल्ड कपसाठी त्यांच्या संघात शेवटच्या क्षणी तीन बदल केले.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 03:07 PM IST

IPL मधील 'हा' महागडा खेळाडू ऐनवेळी इंग्लंडच्या संघात

लॉर्डस, 21 मे : इंग्लंडने त्यांच्या वर्ल्ड कपच्या अंतिम 15 जणांच्या संघात बदल केला आहे. मुख्य निवड अधिकारी एड स्मिथ यांनी लॉर्डसवर नव्या बदलांची घोषणा केली आहे. पहिल्यांदा जाहीर केलेल्या संघात तीन बदल इंग्लंडने केले आहेत.

आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या जोफ्रा आर्चरला संघात घेतलं आहे. अष्टपैलू जो डेनलीच्या जागी त्याला घेण्यात आलं आहे. तर लियाम डॉसनच्या जागी जो डेनलीला घेतलं आहे. फलंदाजीच्या क्रमातही बदल करण्यात आला असून बोर्डाने ड्रग टेस्टमध्ये नापास झालेल्या हेल्सच्या जागी जेम्स विन्सला संधी दिली आहे.

संघात स्थान मिळालेल्या विन्स आणि डॉसन प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. वेगवान गोलंजदाजी करणाऱ्या आर्चरला अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल.

क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडला अजून एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत 4-0 ने विजय मिळवला आहे.

इंग्लंडचा संघ : कर्णधार इयॉन मॉर्गन, मोइन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, क्रिस वोक्स आणि मार्क वूड

Loading...

भर चौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार, CCTV VIDEO आला समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2019 03:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...