NZ vs SA : दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट, आणखी एक सामना होणार रद्द?

दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कपमध्ये आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी न्यूझीलंड विरोधात हा सामना जिंकावा लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 01:12 PM IST

NZ vs SA : दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट, आणखी एक सामना होणार रद्द?

बर्मिंगहॅम, 19 जून : ICC Cricket World Cupमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. 2015मधील वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. याचा वचपा काढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ सज्ज असला तरी, या सामन्यात न्यूझीलंड संघाचे पारडे जड आहे. तर, न्यूझीलंडचा संघ आपला सलग चौथा विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर येण्यास सज्ज आहेत. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळं हा सामना रद्द होऊ शकतो.

यंदा वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 4 सामने पावसामुळं रद्द झाले आहेत. हवामान खात्यानं वॉर्निंग दिली आहे. कारण पूर्ण दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं सामना होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना खुप महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यात पराभव स्विकारला आहे तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला होता. न्यूझीलंडचाही एक सामना पावसामुळं रद्द झाला आहे. गुणतालिकेत सध्या न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं हा सामना झाला नाही तर, दोन्ही संघाना एक-एक गुण देण्यात येईल. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला नमवतं आपला पहिला विजय नोंदवला, त्यामुळं आपले आव्हान या स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावा लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी आनंदाची बातमी म्हणजे जलद गोलंदाज लुंगी एंगिडी खेळणार असल्यामुळं त्याचा फायदा संघाला होऊ शकतो. तर, दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघात चिंतेचे काहीही कारण नाही. न्यूझीलंड संघाने श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तानवर विजय मिळवले असून, भारताविरुद्धची लढत पावसामुळे अनिर्णित राहिली आहे. न्यूझीलंडचे रॉस टेलर, केन विल्यमसन फॉर्मात असून, कॉलिन मुन्रो आणि मार्टिन गप्टील यांच्यात सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.

हेड टू हेड

Loading...

दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 70 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील 41 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. तर, 24 सामन्यात न्यूझीलंडनं विजय मिळवला आहे. तर, वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ 7 वेळा लढले आहेत. यात 5 सामने न्यूझीलंडनं तर, 2 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया


SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...