नवी दिल्ली, 07 जुलै: भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. सध्या धोनी कर्णधार नसला तरी त्याच्याशिवाय भारतीय संघाची रणनिती ठरत नाही. 7 जुलै 1981 रोजी रांची येथे जन्मलेल्या धोनीने गेल्या 15 वर्षात कर्णधार, फलंदाज आणि विकेटकिपर म्हणून अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत.
>फलंदाज म्हणून 6व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा- वनडे करिअरमध्ये धोनीने अधिक काळ 6व्या किंवा 7व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. या खालच्या क्रमांकावर फलंदाजीकरून ही त्याने भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. 6 व्या क्रमांकावर फलंदाजीकरत धोनीने 139 सामन्यात 4 हजार 164 धावा केल्या आहेत. या क्रमांकावर खेळताना त्याने 139 ही सर्वोत्तम खेळी केली आहे.
>वनडेत विकेटकिपर म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने वनडेत नाबाद 183 धावांची खेळी केली आहे. श्रीलंकेविरुद्ध 2005मध्ये ही खेळी केली होती. यात 10 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश होता.
>ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. पण धोनीने ऑस्ट्रेलियाला केवळ त्यांच्या घरच्या मैदानावर हरवले नाही तर त्यांचा क्लीन स्वीप देखील केला आहे. 2015मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत 3-0 असे पराभूत केले होते. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या 140 वर्षाच्या इतिहासात प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर एखाद्या संघाने क्लीन स्वीप केले होते.
>धोनीने डिसेंबर 2004मध्ये बांगलादेशविरुद्ध करिअरचा पहिला वनडे सामना खेळला होता. या मालिकेत तो अपयशी ठरला होता. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने शानदार खेळी केली होती. पाकविरुद्धच्या मालिकेनंतर धोनीने कधीच मागे वळून पाहिले नाही. धोनीने केवळ 42 सामन्यात आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान काढले होते. आयसीसी क्रमवारीत इतक्या वेगाने अव्वल स्थान गाठणारा धोनी हा सर्वात वेगवान क्रिकेटपटू ठरला आहे.
>धोनीने आतापर्यंत 348 सामने खेळले आहेत. या सामन्यातून त्याने 228 षटकार मारले आहे. वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही विकेटकिपरला अशी कामगिरी करता आलेली नाही.
>षटकरा मारून विजय मिळवून देण्यात धोनीचा कोणी हात धरू शकत नाही. धोनीने अनेक वेळा षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. वनडेत धोनीने 9 वेळा षटकार मारून विजय मिळवून दिला असून हा देखील एक विक्रम आहे. अशी कामगिरी करणारा धोनी एकमेव खेळाडू आहे.
>2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीने षटकार मारत 28 वर्षानंतर भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. ज्या बॅटने धोनीने षटकार मारला होता त्याचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात बॅटची किमत एक लाख पाऊंड इतकी मिळाली होती. लिलावात मिळालेली ही सर्वात मोठी बोली ठरली आहे.
>दुसऱ्यांदा फलंदाजीकरत आतापर्यंत चार वेळा विश्वचषक जिंकला आहे. यातील 2011मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध 274 धावा करत मिळवलेला विजय हा सर्वोच्च आहे. यात धोनी असा एकमेवर फलंदाज आहे ज्याने षटकार मारत विजेतेपद मिळवले आहे.
>विकेटकिपर असून देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 22 षटके टाकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. 2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध एक बोल्ड देखील घेतली आहे.
>धोनी हा उत्तर फिनिशर असल्याचे मानले जाते. आकड्यांवर नजर टाकल्यास ते सिद्ध देखील होते. धोनीने अनेक वेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळवून दिला आहे. वनडे मध्ये धोनी 78 वेळा नाबाद राहिला आहे. हा देखील हा एक विक्रम आहे.
>सातव्या क्रमांकावर फलंदाजीकरत सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने 33 सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीकरत 2 शतके केली आहेत. यामध्ये नाबाद 139 ही सर्वोच्च खेळी आहे.
>आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंप करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने कसोटीत 38, वनडेत 122 आणि टी-20मध्ये 33 विकेट घेतल्या आहेत.
>भारताचा सर्वात यशस्वी विकेटकिपर अशी धोनीची ओळख आहे. धोनीने कसोटीत 294 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय वनडेत 394 आणि टी-20त 87 विकेट घेतल्या आहेत. कसोटीमध्ये विकेटकिपर म्हणून कसोटीत द्विशतक करणारा धोनी एकमेव खेळाडू आहे.
>धोनीने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत अशी कामगिरी केवळ 14 खेळाडूंना करता आली आहे. पण 50हून अधिकच्या सरासरीने 10 हजार धावा करणारा धोनी हा पहिला खेळाडू आहे. अशी कामगिरी विराट कोहलीने देखील केली आहे.
>2007मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ट-20 विश्वचषक जिंकला होता. टी-20 प्रकारात सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचा विक्रम आहे. त्याने 72 पैकी 41 सामन्यात विजय मिळवला आहे.
>आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणन धोनीचे नाव अव्वल स्थानी आहे. धोनीने आयपीएलमध्ये 104 सामने जिंकले आहेत. त्याच्या विजयाची टक्केवारी 60 टक्के इतकी आहे. या स्पर्धेत 100हून अधिक सामने जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.
>ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2009मध्ये प्रथमच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते.
>धोनीने भारतीय संघाचे 10 वर्ष नेतृत्व केले आहे. 2007मध्ये टी-20च्या विजेतेपदापासून सुरु झालेला धोनीचा प्रवास 2017मध्ये संपला. कर्णधार म्हणून धोनीने भारतीय संघाचे 332 सामन्यात नेतृत्व केले. यात 60 कसोटी, 200 वनडे आणि 72 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. ऑगस्ट 2016 रोजी धोनीने रिकी पॉन्टिंगचा 324 सामन्यातील कर्णधारपदाचा विक्रम मोडला होता.
>धोनी हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याने भारतीय संघाला 27 कसोटी, 110 वनडे आणि 41 टी-20 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
>आयसीसीच्या सर्व मालिका जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने 2007मध्ये टी-20, 2011मध्ये वनडे वर्ल्ड कप तर 2013मध्ये आयसीसी चॅम्पियन्स टॉफी जिंकली होती.
VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!