World Cup : महिलेसोबत गैरवर्तन, कॉमेंटेटरला विमानातून उतरवलं

महिलांशी गैरवर्तन केल्यानं या कॉमेंटेटरला विमानातून उतरवण्यात आलं. त्यापूर्वी त्याने स्वत:ला स्वच्छतागृहात कोंडून घेतलं होतं.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 11:59 AM IST

World Cup : महिलेसोबत गैरवर्तन, कॉमेंटेटरला विमानातून उतरवलं

सिडनी, 22 मे : ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मायकल स्टेलरला विमानातून उतरवण्यात आलं आहे. स्टेलरने विमानातील दोन महिलांशी गैरवर्तन केल्यानं हकालपट्टी केल्याचं समजतं. या प्रकारामुळे विमानाच्या उड्डाणालाही उशीर झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विमानातून उतरवण्याआधी स्लेटरनं स्वत:ला स्वच्छतागृहात बंद करून घेतलं होतं. मात्र, या गोष्टीला स्लेटरच्या व्यवस्थापकाने फेटाळून लावलं आहे.

स्लेटरनं रविवारी सिडनीतून आपल्या घरी विमानाने जाणार होता. यावेळी विमानात त्याचा दोन महिलांशी वाद झाला. यानंतर स्लेटरने स्वत:ला कोंडून घेतलं. तेव्हा सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्याला विमानातून उतरवण्यात आलं. या प्रकरणानंतर स्लेटरने प्रवाशांची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

मायकल स्लेटर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू असून त्याला आयसीसीनं वर्ल्ड कपसाठी कॉमेंटेटर म्हणून निवडलं आहे. 24 कॉमेंटेटरच्या यादीत स्लेटरचा समावेश आहे.

स्लेटरने ऑस्ट्रेलियाकडून 74 कसोटीत 5 हजार 312 धावा केल्या आहेत. यात त्याची 14 शतके आणि 21 अर्धशतके आहेत. तर 42 एकदिवसीय सामन्यात त्याने 987 धावा केल्या आहेत.

Loading...

वाचा : 'या' दोन देशातील युद्धामुळे पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कपला उशिर


VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...