VIDEO : गेल बाद नव्हताच! पंचांची चूक अन् 3 वेळा रिव्ह्यू

VIDEO : गेल बाद नव्हताच! पंचांची चूक अन् 3 वेळा रिव्ह्यू

ICC Cricket World Cup 2019 : कांगारुंनी गेलची शिकार लवकर केली असली तरी तिसऱ्यावेळी तो बाद नव्हता अशी चर्चा आता होत आहे. पाहा काय आहे कारण...

  • Share this:

नॉटिंगहम, 06 जून : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने 17 चेंडूत 21 धावा केल्या. तो लवकर बाद झाला असला तरी त्याची ही खेळी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. गेलने 17 चेंडू खेळताना 4 चौकारांच्या सहाय्याने 21 धावा काढल्या. यात त्याला दोन वेळा जीवदान मिळालं पण त्याचा फायदा घेतला आला नाही.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 289 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात लेविस बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या षटकात नाट्यमय घडामोडी घडल्या. ख्रिस गेलने या षटकात दोन रिव्ह्यू घेतले. प्रत्येक संघ एका डावात दोन वेळा रिव्ह्यू घेऊ शकतो. गेलने तर तिसरा रिव्ह्यूसुद्धा घेतला. पहिल्या दोन्ही रिव्ह्यूमध्ये त्याच्या बाजूनं निर्णय आला पण तिसऱ्यांदा मात्र त्याचा अंदाज चुकला.तिसऱ्या षटकात मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर गेलला पहिल्यांदा झेलबाद दिलं होतं. तर दुसऱ्या वेळी पायचित दिलं होतं. दोन्हीवेळा गेलनं डीआरएस घेतला आणि मैदानावरील पंचांना निर्णय बदलावा लागला.विशेष म्हणजे पाचव्या षटकात पुन्हा स्टार्कच्या गोलंदाजीवर गेलने रिव्ह्यू घेतला. त्यावेळी गेल पायचित झाला आणि पंचांनी त्याला बाद दिलं. तेव्हा रिव्ह्यूमध्ये चेंडू स्टम्पवर जात असल्याचं दिसलं. दोनवेळा रिव्ह्यूने त्याला साथ दिली मात्र, तिसऱ्यावेळी मात्र तो बाद झाला. या सामन्यात 21 धावा करणाऱ्या गेलने वर्ल्ड कप कारकिर्दित 1 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला.गेल दोनवेळा रिव्ह्यूमध्ये नाबाद ठरल्यानंतर तिसऱ्यावेळी बाद दिला गेला. पण तो बाद झाला त्याच्या आधीचा चेंडू नो बॉल होता. आणि त्याकडे पंचांचे दुर्लक्ष झालं. आता यावर अनेकांनी पंचांना टार्गेट करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.आयपीएलमध्ये पंचांच्या चुकीच्या निर्णयाने अनेक वाद झाले होते आता वर्ल्ड कपमध्ये अशा प्रकाराने ती चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.


वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-World Cup : सामना जिंकूनही टीम इंडियाला फटका, गुणतालिकेत 'हा' संघ पहिल्या क्रमांकावर


खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 09:16 PM IST

ताज्या बातम्या