बांगलादेशचा कर्णधार भडकला, ICC ला सुनावले खडे बोल

ICC World Cup 2019 पावसामुळे तब्बल तीन सामने रद्द झाले असून पुढच्या काही सामन्यांवरसुद्धा पावसाचे सावट आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 09:25 PM IST

बांगलादेशचा कर्णधार भडकला, ICC ला सुनावले खडे बोल

लंडन, 11 जून : ICC Cricket World Cup 2019 मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. ब्रिस्टलच्या काउंटी क्रिकेट स्टेडियमवर पाऊस थांबण्यासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तब्बल चार तास वाट पाहिली. शेवटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेत पंचांनी दोन्ही संघांना एक एक गुण दिला.

बांगलादेशने वर्ल्ड कपमध्ये तीन सामने खेळले आहेत. यातील 2 सामन्यात पराभव तर एका सामन्यात त्यांचा विजय झाला आहे. तर लंकेला एक विजय आणि एक पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचा एक सामना पावसाने वाया गेला होता.

पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर निराश झालेल्या बांगलादेशच्या कर्णधाराने आयसीसीलाच खडे बोल सुनावले आहेत. मुर्तझा म्हणाला की, सर्व संघांसाठी मैदानावर येऊन न खेळणं खूपच निराशाजनक आहे. ही कसली स्पर्धा आहे समजत नाही. एका आठवड्यात तीन सामने रद्द झाले.

आम्हाला न्यूझीलंडविरुद्ध विजयाची संधी होती पण पराभव झाला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धही आम्ही हरलो. मात्र, आज आम्हाला आशा होती की चांगला खेळ करू पण पावसाने निराशा केली असं बांगलादेशचा कर्णधार मुर्तझाने म्हटलं.अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनची तब्येत बिघडली आहे. मात्र तो 4-5 दिवसांत ठीक होईल असंही मुर्तझाने सांगितलं.

आतापर्यंत तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असलेल्या नॉटिंगहॅम इथं भारताचा पुढचा सामना होणार आहे. न्यूझीलंड आणि भारताला सरावही करता आला नाही. येत्या दोन दिवसांत पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. असे झाल्यास भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द करावा लागण्याची शक्यता आहे.

Loading...

वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर

वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 09:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...