लंडन, 03 मे : वर्ल्ड कप 2019मध्ये बांगलादेशचा संघ उलथापालथ करणारा संघ बनला आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला टार्गेट करत, 21 धावांनी त्यांचा पराभव केला. वर्ल्ड कप स्पर्धेला आताच सुरुवात झाली आहे, मात्र जर मागचे काही आकडे पाहिल्यास बांगलादेश संघानं दक्षिण आफ्रिकेला पहिल्या सामन्यात धुळ चारत सेमीफायनलमधले आपले स्थान पक्के केले आहे.
आफ्रिकेविरुद्ध 330 धावांचा डोंगर उभा करून बांगलादेशनं एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. शिवाय त्यांनी आफ्रिकेला 21 धावांनी पराभव पत्करण्यास भाग पाडले. दरम्यान, बांगलादेशने पहिला सामना जिंकणे, म्हणजे अन्य संघांसाठी धोक्याचा इशारा असल्याचे वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास सांगतो. त्यामुळे यंदाच्या बदललेल्या फॉरमॅटमध्ये हा संघ कोणला पाणी पाजतो, याची उत्सुकता लागली आहे. तमीम इक्बाल व सौम्या सरकार यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. त्यानंतर शकिब व मुशफिकर यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही बांगलादेशच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. पण जर बांगलादेश संघाचा वर्ल्ड कपमधला इतिहास पाहिल्यास वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिल्यानंतर बांगलादेशने पुढील फेरीत प्रवेश करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे यंदाही त्यांच्याकडून या चमत्काराची अपेक्षा करण्यास काही हरकत नाही.
असा आहे बांगलादेशचा इतिहास
1999- वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशनं सामना गमावला होता.त्यामुळं नॉकआऊटच्याआधीच ते स्पर्धेबाहेर गेले होते.
2003- या वर्ल्ड कप स्पर्धेतही बांगलादेशनं पहिला सामना गमावला, त्यामुळं या वर्ल्ड कपमध्येही ते स्पर्धेबाहेर पडले.
2007- या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा इतिहास बदलला. सलामीच्या सामन्यात विजय मिळवत बांगलादेशच्या संघानं थेट सुपर-8मध्ये प्रवेश केला होता.
2011- या स्पर्धेतही त्यांना सलामीच्या लढतीत पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळं त्यांना नॉकआऊट सामन्य़ाआधीच मायदेशी परतावे लागले.
2015- सलामीच्या सामन्यात विजय मिळवत बांगलादेशनं थेट क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती.
वाचा- World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल
वाचा- World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात
वाचा- World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट
VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'