ऑस्ट्रेलियाची एक चूक, रोहित पुन्हा शतक करणार?

ऑस्ट्रेलियाची एक चूक, रोहित पुन्हा शतक करणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

ओव्हल, 09 जून : ICC Cricket World Cup मध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियासोबत भारताचा दुसरा सामना ओव्हलवर होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सावध सुरुवात केली. 8 षटकांत बिनबाद 36 धावांची भागिदारी केली.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये जीवदान मिळाले. हिटमॅन रोहितचा कॅच ऑस्ट्रेलियाने सोडला. मिशेल स्टार्कनं आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. मात्र त्याच्या तिसऱ्या चेंडूवर नाथन कूल्टर नाइलनं रोहित शर्माचा झेल सोडला. रोहित शर्मा केवळ 2 धावांवर असताना त्याला जीवनदान मिळाले. हे जीवदान ऑस्ट्रेलियाला महागात पडू शकतं.

भारताने पहिला सामना दक्षिण आफ्रिवेविरुद्ध खेळला. या सामन्यात विजय मिळवून दुसऱ्या विजयासाठी भारत मैदानात उतरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यातही रोहित शर्माला जीवदान मिळाले होते. त्या जीवदानाचा फायदा घेत रोहितने नाबाद 122 धावांची खेळी करत विजय मिळवून दिला.

पाचवेळा जगज्जेता झालेला ऑस्ट्रेलियाचा संघ दोनवेळा चॅम्पियन ठरलेला भारतीय संघाविरोधात जिंकण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 11 वेळा लढती झाल्या आहे. यात भारतानं 3 तर ऑस्ट्रेलियानं 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळं या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असले तरी, पहिल्या विजयानंतर भारतीय संघ मोठ्या विजयासाठी सज्ज आहे. ओव्हलच्या मैदानावर भारतानं 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ एका सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे.

असा असेल भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल.

ऑस्ट्रेलियाचा संघ : एरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी , नाथन कूल्टर नाइल, पैट कमिंस, मिचेल स्टार्क, एडम जंपा.

वाचा- IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला हिटमॅनची भीती, कांगारुंविरोधात रोहितचे रेकॉर्ड तगडे

वाचा- World Cup : विराट करणार सचिनची बरोबरी, एक पाऊल दूर!

बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीस, यासोबत इतर महत्त्वाच्या घडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 04:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading