World Cup : वॉर्नर सर्व सामन्यात खेळावा म्हणून ऑस्ट्रेलियाने घेतली खास काळजी!

ICC Cricket World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 05:14 PM IST

World Cup : वॉर्नर सर्व सामन्यात खेळावा म्हणून ऑस्ट्रेलियाने घेतली खास काळजी!

लॉर्ड्स, 25 जून : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरू असून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांनी भक्कम सुरूवात करून दिली आहे. सामन्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी वॉर्नर सर्वा सामन्यासाठी उपलब्ध राहिल असं सांगितलं. वॉर्नरने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरने दोन शतके झळकावली आहेत.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजीची भिस्त वॉर्नरवर आहे. त्यामुळे एकाही सामन्यात तो खेळला नाही तर संघाला मोठं नुकसान होऊ शकतं. यासाठी वॉर्नरच्या पत्नीलासुद्धा इंग्लंडला आणण्यात आलं आहे. वॉर्नरची पत्नी गर्भवती असून येत्या आठवड्यात ती अपत्याला जन्म देईल. ऑस्ट्रेलियाचा संघ रविवार पर्यंत लंडनमध्ये राहणार आहे. त्यांचे पुढचा सामना न्यूझीलंडशी शनिवारी होणार आहे. त्यानंतर संघ मँचेस्टरला जाणार आहे.

वॉर्नर सर्व सामन्यात खेळावा यासाठी त्याची पत्नी कँडिसला लंडनमध्ये बोलवून घेण्यात आलं आहे. आता ती इथं असल्यामुळं वॉर्नर कोणत्याच सामन्यात अनुपस्थित राहणार नाही. यामुळं संघाला ऐनवेळी कोणतंही नुकसान होणार नाही. जरी वॉर्नरला एखाद्या सामन्यात खेळता आलं नाही तरी संघ त्यासाठी तयार आहे. तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा ख्वाजा याआधी फिंचसोबत सलामीला उतरला आहे. तसेच शॉन मार्श तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. तरीही खबरदारी म्हणून वॉर्नरच्या पत्नीलाच लंडनमध्ये बोलवून घेतंल आहे.

वॉर्नरला पहिली मुलगी झाली तेव्हा 2014 मध्ये तो झिम्बॉम्बे दौऱ्यावर गेला नव्हता. त्यानंतर 2016 मध्ये दुसऱ्या मुलीच्या जन्मावेळीसुद्धा तो दोन एकदिवसीय सामने खेळला नव्हता.

वॉर्नरने म्हटलं की, अपत्याचा जन्म झाल्यानंतर माझ्या खेळावर परिणाम होणार नाही. सध्या माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हा महत्त्वाचा काळ आहे. पत्नीची तब्येत चांगली रहावी याकडे माझं लक्ष आहे. असं असलं तरी खेळाकडे दुर्लक्ष होणार नाही असंही वॉर्नरने सांगितलं.

Loading...

वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका

‘भारताचा हा हुकुमी एक्का चालला की वर्ल्ड कप थेट विराटच्या हातात’

वाचा-अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण

बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...