ऑस्ट्रेलियाचा 15 धावांनी विजय, मिशेलच्या माऱ्यापुढं विंडीजचे लोटांगण

AUS vs WI Live Updates, World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत धाडला.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 11:09 PM IST

ऑस्ट्रेलियाचा 15 धावांनी विजय, मिशेलच्या माऱ्यापुढं विंडीजचे लोटांगण

नॉटिंगहॅम, 06 जून : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात एखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कांगारुंनी बाजी मारली. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 289 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 9 बाद 273 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियानं हा सामना 15 धावांनी जिंकून वर्ल्ड कपमधील दुसऱ्या विजयाची नोंद केली. सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी धावगती चांगली राखली होती. पण शेवटच्या षटकांत स्टार्कने वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांना बाद करून सामना आपल्या बाजूने फिरवला. त्याने 39 व्या षटकात रसेलला आणि ब्रेथवेट, होल्डरला बाद केलं. यामुळे वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा मावळल्या.विंडिजकडून शाय होपनं सर्वाधिक 68 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार होल्डरने 51 तर निकोलस पूरनने 40 धावा केल्या. गेल, रसेल  आणि हेटमायर यांना  फारशा धावा करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने 5 विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला.

तत्पूर्वी,वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी ऑस्ट्रेलियाला 288 धावांत रोखलं. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर लवकर बाद झाले. अॅरॉन फिचला थॉमसने बाद केलं. फिंचने 6 धावा केल्या. त्यानंतर वॉर्नरसुद्धा लगेच बाद झाला. त्याला कॉट्रेलनं  3 धावांवर बाद केलं. तर रसेलनं ऑस्ट्रेलियाला तिसरा दणका दिला. त्याने ख्वाजाला शाय होपकरवी झेलबाद केलं.

पाहा : VIDEO : गेल बाद नव्हताच! पंचांची चूक अन् 3 वेळा रिव्ह्यू

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला कॉट्रेलनं बाद करून चौथा धक्का दिला. त्यानंतर मार्कस स्टोइनिसला जेसन होल्डरने बाद केलं. स्टीव्हन स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी यांनी 68 धावांची भागिदारी करत पडझड थांबवली.या दोघांची जोडी रसेलनं फोडली. त्याने कॅरीला बाद करून ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. कॅरी 55 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर स्मिथने कुल्टर नाइलच्या साथीनं संघाला 200 च्या पार धावा करून दिल्या. स्मिथने 73 धावा केल्या. त्याला ओशाने थॉमसनं बाद केलं.

वाचा : धोनीच्या ग्लोव्हजवर ICC चा आक्षेप, BCCIला केली सूचना

Loading...

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने वर्ल्ड कपमधील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानवर विजय मिळवला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात 9 वेळा वर्ल्ड कपमध्ये लढत झाली आहे.

वाचा- VIDEO : फक्त 120 सेकंदात पाहा कशी केली रोहितनं आफ्रिकन सफाई !

वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-World Cup : सामना जिंकूनही टीम इंडियाला फटका, गुणतालिकेत 'हा' संघ पहिल्या क्रमांकावर


खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 11:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...