ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी विजय, बांगलादेशनं शेवटपर्यंत दिली झुंज!

ICC Cricket World Cup 2019 : Australia vs Bangladesh : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 381 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या मुश्फिकर रहिमने नाबाद शतकी खेळी करत अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली.

News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 11:28 PM IST

ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी विजय, बांगलादेशनं शेवटपर्यंत दिली झुंज!

नॉटिंगहॅम, 20 जून : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. त्यांना 8 बाद 333 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह गुणतक्त्यात पहिल्या स्थानी झेप घेतली. बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकार लवकर बाद झाला. त्यानंतर तमिम इक्बालने शाकीबअल हसनसोबत संघाला 100 धावा पूर्ण करून दिल्या. शाकिब अल हसन 41 धावांवर बाद झाला. त्यानंतर तमिम इक्बालसुद्धा 62 धावा करून बाद झाला. स्टार्कच्या गोलंदाजीवर चेंडू बॅटला लागून स्टम्पवर आदळला. इक्बालनंतर आलेल्या लिंटन दासने 20 धावांची खेळी केली. लिंटन बाद झाल्यानंतर मुश्फिकर रहिम आणि मोहमदुल्लाहने 127 धावांची भागिदारी केली. कुल्टर नाइलने ही जोडी फोडली. मोहमदुल्लाहने 50 चेंडूत 69 धावा केल्या. 46 व्या षटकात मोहमदुल्लाह बाद झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर नाईलने शबीरला बाद केलं. मुश्फिकरने 102 धावांची नाबाद खेळी केली.

बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरच्या दीडशतकाच्या जोरावर 50 षटकांत 5 बाद 381 धावा केल्या. दरम्यान, 49 षटकानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. तत्पूर्वी, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंचने पहिल्या विकेटसाठी 212 धावांची भागिदारी केली. फिंच सौम्या सरकारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 51 चेंडूत 53 धावा केल्या. त्यानंतर वॉर्नर आणि उस्मान ख्वाजाने डावाची सूत्रे हाती घेतली. वॉर्नरने यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसऱं शतक साजरं केलं. वॉर्नरने 110 चेंडूत शतक केल्यानंतर पुढच्या 29 चेंडूत 50 धावा फटकावल्या. उंच फटका मारण्याच्या नादात वॉर्नर बाद झाला. त्याने 147 चेंडूत 166 धावा केल्या. वॉर्नर आणि उस्मान ख्वाजाने 192 धावांची भागिदारी केली. उस्मान ख्वाजाने फटकेबाजी केली. ख्वाजा सौम्या सरकारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 72 चेंडूत 89 धावा केल्या. फिंच, वॉर्नर आणि ख्वाजा हे तिघेही सौम्या सरकारच्या गोलंदाजीवरच झेलबाद झाले. तर ग्लेन मॅक्सवेल धावबाद झाला. स्टीव्हन स्मिथ फक्त एक धावा काढून बाद झाला. त्याला मुस्तफिझुरने पायचित केलं.

ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. मार्कस स्टोईनिस, अॅडम झाम्पा, नाथन कुल्टर नाइल यांना संघात स्थान दिलं आहे. तर बांगलादेशनं प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले असून रुबेल हुसेन आणि शब्बीर रहमानला संघात घेतलं आहे.

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारत वगळता इतर संघांविरुद्ध विजय मिळवला आहे. तर बांगलादेशनं दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला पराभूत केलं आहे. बांगलादेश पाच सामन्यात पाच गुण मिळवून पाचव्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यात 4 विजय मिळवून गुणतक्त्यात दुसरं स्थान पटकावलं आहे.

World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

Loading...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 11:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...