World Cup : 'या' खेळाडूंचं स्वप्न, आधी विजेतेपद मग निवृत्ती

World Cup : निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले खेळाडू मिळवून देतील का जेतेपद?

  • Share this:

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होण्यासाठी एक महिना उरला आहे. प्रत्येक संघ वर्ल्ड कप जिंकण्यासाठी उत्सुक आहे. यात सहभागी होणाऱ्या काही संघातील खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. वर्ल्ड कपनंतर अनेक दिग्गज खेळाडू निवृत्तीची घोषणाही करू शकतात.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होण्यासाठी एक महिना उरला आहे. प्रत्येक संघ वर्ल्ड कप जिंकण्यासाठी उत्सुक आहे. यात सहभागी होणाऱ्या काही संघातील खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. वर्ल्ड कपनंतर अनेक दिग्गज खेळाडू निवृत्तीची घोषणाही करू शकतात

वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त वयाचा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर आहे. 40 वर्षांचा असलेल्या इम्रानने 98 एकदिवसीय सामन्यात 162 विकेट घेतल्या आहेत. ताहिरनंतर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला दुसरा वयस्क खेळाडू आहे.

स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ख्रिस गेल वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. 39 वर्षाचा असलेल्या गेलने 289 एकदिवसीय सामन्यात 10 हजार 151 धावा केल्या आहेत. यात 25 शतकं आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय एका द्विशतकही त्यानं केलं आहे.

 पाकिस्तानच्या संघात मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिक या दोघांना स्थान देण्यात आलं आहे. हाफीज 38 वर्षांचा असून 208 एकदिवसीय सामन्यात त्याने 11 शतकांसह 6 हजार 302 धावा आणि 137 विकेट घेतल्या आहेत. तर शोएब मलिकने 282 एकदिवसीय सामन्यात 9 शतकांसह 7 हजार 481 धावा करताना 156 विकेटही घेतल्या आहेत.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचाही या यादीत समावेश आहेत. 37 वर्षीय धोनी 341 एकदिवसीय सामने खेळलेल्या धोनीने 10 हजार 500 धावा केल्या आहेत. यात 10 शतक आणि 71 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीनंतर संघात केदार जाधव हा वयस्क खेळाडू आहे.

न्यूझीलंडसाठी सर्वात जास्त शतके करणारा रॉस टेलर 35 वर्षांचा असून त्याने 210 एकदिवसीय सामन्यात 8 हजार 26 धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय कोलिन डी ग्रॅंडहोम (32 वर्ष), मार्टिन गुप्टिल (32 वर्ष) हे खेळाडू जास्त वयाचे आहे.

आतापर्यंत 5 वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघात 35 वर्षाचा शॉन मार्श सर्वात वयस्क खेळाडू आहे. त्याने 71 एकदिवसीय सामने खेळले असून यात 7 शतके केली आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांचे वय 32 वर्ष आहे.

श्रीलंकेच्या संघात फिरकीपटू जीवन मेंडीस हा सर्वात वयस्क खेळाडू आहे. त्याने 54 सामने खेळले असून त्यात 28 विकेट घेतल्या आहेत. त्याच्यानंतर लसिथ मलिंगा दुसरा वयस्क खेळाडू आहे. मलिंगाने 218 एकदिवसीय सामन्यात 322 विकेट घेतल्या आहेत.

बांगलादेशचा मुशरफ मुर्तजा हा सर्वात जास्त वयाचा खेळाडू असून त्याच्याकडेच वर्ल्ड कपसाठी नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. 35 वर्षांचा असलेल्या या खेळाडूने 205 एकदिवसीय सामन्यात 259 विकेट घेतल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 06:41 PM IST

ताज्या बातम्या