आफ्रिकेला झालंय तरी काय? कर्णधार म्हणतो 'या' गोष्टीचा फटका

आफ्रिकेला झालंय तरी काय? कर्णधार म्हणतो 'या' गोष्टीचा फटका

ICC Cricket World Cup 2019 : वर्ल्ड कपमधील पहिल्या दोन सामन्यात पराभव झालेल्या आफ्रिकेची भारताविरुद्ध घसरगुंडी उडाली.

  • Share this:

साउथॅम्पटन, 05 जून : वर्ल्ड कपमधील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करल्यानंतर आफ्रिकेचा सामना सर्वात संतुलित संघ असलेल्या भारताशी होत आहे. या सामन्यात भारताच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांना टिकाव धरता आला नाही. दुखापतीने ग्रासल्याने आफ्रिकेचा संघ दुबळा झाला आहे. हाशिम आमला, ड़ेल स्टेन, कसिगो राबाडा हे तिघेही अनफिट आहेत. आफ्रिकेचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज स्टेन गन वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर कसिगो राबाडा आणि लुंगी एनगिडी हे दोघेही अनफीट आहेत.

आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीने आफ्रिकेच्या या अवस्थेला आयपीएल जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेन आयपीएलमध्येच जखमी झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुकडून खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर आहे की, त्याला वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागलं आहे.

याशिवाय कसिगो रबाडासुद्धा आयपीएलमध्ये जखमी झाला होता. दिल्लीकडून खेळताना त्याला आयपीएलच्या समेमीफायनलला खेळता आले नव्हते. त्यावेळी रबाडाला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं मायदेशी बोलावून घेतलं होतं.

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलासुद्धा दुखापतीने ग्रस्त आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याला फक्त 6 धावाच करता आल्या. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला बाहेर बसावं लागलं होतं. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली.

भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना एका पाठोपाठ बाद केलं. आफ्रिकेटचा कर्णधार फाफ डुप्लेसी, डेव्हिड मिलर, अँडी पेहलुक्वायो आणि ख्रिस मोरिस यांना 30 पेक्षा जास्त धावा करता आल्या. सलामीवीर हाशिम आमला आणि क्विंटन डीकॉक स्वस्तात बाद झाले.

SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जिवाला धोका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 06:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading