AFGvNZ: नीशाम-फर्ग्युसनच्या माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा 173 धावांत खुर्दा

ICC Cricket World Cup 2019 : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नीशामने 5 तर लॉकी फर्ग्युसनने 4 गडी बाद केले.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 11:33 PM IST

AFGvNZ:  नीशाम-फर्ग्युसनच्या माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा 173 धावांत खुर्दा

नॉटिंगहॅम, 08 जून : ICC Cricket World Cup मध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेम्स निशाम आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा संघ 172 धावांत गुंडाळला. अफगाणिस्तानकड़ून फक्त हशमतुल्लाह शाहिदी एकटाच न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर उभा राहू शकला. त्याने 59 धावांची खेळी केली. या जोरावरच अफगाणिस्तानने 172 धावा केल्या. न्यूझीलंडचा गोलंदाज जेम्स निशामनं 31 धावा देत 5 विकेट घेतल्या तर फर्ग्युसनने 37 धावात 4 जणांना तंबूत धाडलं.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या अफगाणिस्तानच्या सलामीच्या जोडीने 66 धावांची भागिदारी केली. पण निशाम आणि फर्ग्युसन यांची गोलंदाजी सुरू होताच एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. जेम्स निशामने अफगाणिस्तानच्या रहमत शाह, गुलबदीन नैब, मोहम्मद नबी, नाजीबुल्लाह जारदन यांना लागोपाठ बाद केलं. तर फर्ग्युसनने राशिद खान आणि आफताब आलम यांना बाद केलं.

अफगाणिस्तानच्या 35.4 षटकांत 9 बाद 147 धावा झाल्या होत्या. पण हशमतुल्लाहने हामिद हसनच्या साथीने शेवटच्या विकेटसाटी 25 धावांची भागिदारी केली. शेवटी मॅट हेन्रीने त्याला बाद करून डाव संपवला. हशमतुल्लाहने 99 चेंडूत 59 धावा केल्या तर हस 7 धावांवर नाबाद राहिला.

VIDEO : मन्नत पूर्ण, आदित्य ठाकरे पोहोचले अजमेरच्या दर्ग्यात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 11:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...