World Cup : धोनी राशिदच्या जाळ्यात कसा फसला? पाहा VIDEO

World Cup : धोनी राशिदच्या जाळ्यात कसा फसला? पाहा VIDEO

ICC Cricket World Cup 2019 : भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी राशिद खानच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला. त्याने 52 चेंडूत 28 धावा केल्या.

  • Share this:

साउथॅम्पटन, 22 जून : अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फक्त 225 धावांपर्यंत मजल मारू शकले. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांनी अर्धशतके केली. सलामीवीर लोकेश राहुल 30 धावा केल्या. त्याशिवाय विजय शंकर आणि धोनी यांनी अनुक्रमने 29 आणि 28 धावांची खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा फक्त एक धाव काढून बाद झाला.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाची सुरूवात निराशाजनक झाली. सलामीवीर रोहित शर्मा 10 चेंडूत 1 धाव काढून परतला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी भागिदारी केली. केएल राहुल बाद झाल्यानंतर कोहलीने विजय शंकरसोबत अर्धशतकी भागिदारी केली. विजय शंकर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या धोनीने संथ खेळी केली. धोनीने 52 चेंडूत 28 धावा केल्या. राशिद खानच्या चेंडूवर पुढे जाऊन खेळण्याच्या नादात धोनी बाद झाला. यष्टीरक्षक म्हणून धोनीचा दबदबा सर्वांनाच माहिती आहे. पण तोच राशिदच्या जाळ्यात अडकला आणि यष्टीचित झाला.

भारताची पडझड थांबवण्यासाठी धोनीने सावध खेळ केला असला तरी त्याच्या या संथ खेळीवरून टीका केली जात आहे. सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी त्याला पुन्हा निवृत्तीचा सल्ला दिला आहे.

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

First published: June 22, 2019, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading