World Cup : निवृत्ती मागे घेतो वर्ल्ड कप खेळू द्या, बोर्ड म्हणालं शक्य नाही

वर्ल्ड कपच्या आधी संघ व्यवस्थापनेने केलेली चूक संघाला पडणार महागात.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 03:09 PM IST

World Cup : निवृत्ती मागे घेतो वर्ल्ड कप खेळू द्या, बोर्ड म्हणालं शक्य नाही

लंडन, 06 जून : कागदावर बलाढ्य वाटणाऱ्या दक्षिण आफ्रिकाच्या संघाला वर्ल्ड कपमध्ये मात्र चांगली कामगिरी करता आलेली नाही. ड्यु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आतापर्यंत एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. भारत, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरोधात दक्षिण आफ्रिकेला मिळालेल्या मानहानीकारक पराभवानंतर आफ्रिकेला झालय काय, असा प्रश्न समोर आला आहे.

दरम्यान क्रिकइन्फो या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हीलियर्सनं यानं वर्ल्ड कपचा संघ जाहीर होण्याआधी आपल्याला संघात घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या संघ व्यस्थापनेने एबीची ही इच्छा धुडकावून लावली. दक्षिण आफ्रिकेचा संघ घोषित करण्यात येण्याच्या पुर्वसंध्येलाच एबीनं पुन्हा संघात सामिल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र गेली एक वर्ष आफ्रिकेचा जो संघ खेळत आहे, त्या संघावर अन्याय होईल या विचाराने , दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अंतिम संघात एबीला सामिल करुन घेतले नाही.

एबीनं मे, 2018मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. मात्र, सुत्रांनी क्रिकइन्फो या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार एबीनं कर्णधार ड्यु प्लेसिस आणि ओटीस गिब्सन यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र निवड समितीचे सदस्य लिंडा झोंडी यांनी डिव्हीलियर्सला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन विश्वचषक संघात संधी मिळणं शक्य नसल्याचं सांगितलं. एबीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघानं 2015च्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची वाताहत पाहता हा निर्णय संघव्यवस्थापनाला महागात पडण्याची शक्यता आहे.

ड्युप्लेसिसनं फोडले आयपीएलवर खापर

आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीने आफ्रिकेच्या या अवस्थेला आयपीएल जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेन आयपीएलमध्येच जखमी झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुकडून खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर आहे की, त्याला वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागलं आहे. याशिवाय कसिगो रबाडासुद्धा आयपीएलमध्ये जखमी झाला होता. दिल्लीकडून खेळताना त्याला आयपीएलच्या समेमीफायनलला खेळता आले नव्हते. त्यावेळी रबाडाला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं मायदेशी बोलावून घेतलं होतं. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलासुद्धा दुखापतीने ग्रस्त आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याला फक्त 6 धावाच करता आल्या. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला बाहेर बसावं लागलं होतं. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली.

Loading...

वाचा- VIDEO : फक्त 120 सेकंदात पाहा कशी केली रोहितनं आफ्रिकन सफाई !

वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-World Cup : सामना जिंकूनही टीम इंडियाला फटका, गुणतालिकेत 'हा' संघ पहिल्या क्रमांकावर


खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2019 03:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...