World Cup : कपिल देव यांची ती विक्रमी खेळी रेकॉर्ड झालीच नाही!

भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार कपिल देव यांनी 18 जूनला झालेल्या सामन्यात 175 धावांची खेळी केली होती.

  • Share this:

भारतात क्रिकेटची लोकप्रियता वाढली ती कपिल देवच्या नेतृत्वाखाली 1983 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर. त्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव यांच्या एका खेळीनंतर भारताने इतिहास रचला होता. ती खेळी 18 जून 1983 ला झिम्बॉम्बेविरुद्ध केली होती.

सध्या झटपट क्रिकेटच्या जमान्यात तुफान फटकेबाजी बघायला मिळते. ज्यावेळी 4 च्या सरासरीने धावा झाल्या तरी खूप समजल्या जात होत्या तेव्हा कपिल देव यांनी चौकार षटकारांचा पाऊस पाडला होता.

कपिल देव यांनी संघाला बिकट परिस्थीतून वाचवलं होतं. कपिल देव फलंदाजी करायला आले तेव्हा संघाच्या 5 बाद 17 धावा झाल्या होत्या. झिम्बॉम्बेविरुद्ध साखळी सामन्यात भारत पराभूत होण्याची शक्यता होती.

18 जून 1983 ला इंग्लंडमधील टनब्रिल वेल्स येथे झालेल्या झिम्बॉम्बेविरुद्धच्या सामन्यात कपिल देव फलंदाजीला मैदानात उतरले तेव्हा भारताच्या 4 बाद 9 धावा झाल्या होत्या.

कपिल देव यांना स्ट्राइक मिळेपर्यंत पुढच्या 8 धावात आणखी एक गडी बाद झाला होता. त्यानंतर सगळी सूत्रे आपल्या हाती घेत त्यांनी तुफान फटकेबाजी केली. कपिल देव यांनी 138 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. यामध्ये 16 चौकार आणि 6 षटकार मारले.

कपिल देव यांच्यानंतर भारताकडून या सामन्यात सर्वाधिक धावा सय्यद किरमानी यांनी काढल्या. किरमानी 24 धावांवर नाबाद राहिले होते. कपिल देव यांच्या 175 धावांच्या जोरावर भारताने 60 षटकांत 8 बाद 266 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बॉम्बेचा संघ 235 धावा करू शकला. या विजयानंतर 7 दिवसांनी भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करून पहिला वर्ल्ड कप जिंकला.

कपिल देव यांची 138 चेंडुतली 175 धावांची खेळी रेकॉर्ड होऊ शकली नाही. त्यादिवशी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना महत्त्वाचा वाटत असल्यानं सर्व कॅमेरे त्या सामन्याचे शूटिंग करण्यासाठी दिली होती. तर बीबीसीचा नेमका त्याच दिवशी संप होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 05:12 PM IST

ताज्या बातम्या