World Cup : फक्त 11 दिवसांत कळणार भारत विश्वविजेता होणार की नाही !

एकूण 6 आठवड्यांच्या या स्पर्धेमध्ये भारत एका आठवड्यानंतर पहिला सामना खेळत आहे. पहिल्या 11 दिवसांतच भारत चार महत्त्वाचे सामने खेळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 01:56 PM IST

World Cup : फक्त 11 दिवसांत कळणार भारत विश्वविजेता होणार की नाही !

वर्ल्ड कप सुरु होऊन एक आठवडा झाला असला तरी, भारत आज आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळं या सामन्यात सगळ्यात जास्त नजरा आहेत, त्या विराट कोहलीवर. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळणार आहे.

विराट कोहली कर्णधार म्हणून आपला पहिला वर्ल्ड कप खेळत आहे. त्यामुळं त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. पण यंदाचा वर्ल्ड कप हा विराट कोहलीच्या फलंदाजीवर आणि बुमराहच्या गोलंदाजीवर असणार आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली महान फलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर कोहलीची बॅट शांत असते. ही भारतासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. 2011 आणि 2015च्या वर्ल्डकपमध्ये विराटनं पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. मात्र सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा 2011 साली 18वा तर, 2015मध्ये 21व क्रमांक होता. त्यामुळं त्याच्या फलंदाजीतलं सातत्य भारतासाठी महत्त्वाचं असणार आहे.

Loading...

विराटनंतर कोणत्या खेळाडूवर भारतीय संघाची मदार असेल तर तो आहे, जसप्रीत बुमराह. 23 वर्षांच्या या गोलंदाजाकडून सर्वांच्याच जास्त अपेक्षा आहेत. इंग्लंडमधले हवामान आणि मैदान पाहता, यावर बुमराहची गोलंदाजी कमाल करेल अशी अपेक्षा आहे.

जसप्रीतच्या यॉर्करकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरे, स्वींग गोलंदाजीवरही तेवढीच मदार आहे, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे हुकुमी एक्के असू शकतील. शमी 2015च्या वर्ल्ड कपमधअये सगळ्यात सफल गोलंदाज ठरला होता. त्यामुळं यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही त्याच्याकडून अपेक्षा आहेत.

13 जूनला भारतीय संघ न्यूझीलंडशी लढणार आहे. नॉटिंगहमच्या टेंट ब्रिजवर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध लढणार असून भारताला या संघाविरुद्ध सराव सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

एकूण 6 आठवड्यांच्या या स्पर्धेमध्ये भारत एका आठवड्यानंतर पहिला सामना खेळत आहे. पहिल्या 11 दिवसांतच भारत चार महत्त्वाचे सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका, न्युझीलंड आणि पाकिस्तानच्या विरोधात भारत सामना जिंकला तर, वर्ल्ड कपला गवसणी घालणे विराटसेनेसाठी सोपे होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...