कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द ?

कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द ?

आगामी काळात कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द होण्याची शक्यता आहे. आयसीसीकडून याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान २८-२९ मे रोजी मुंबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेतला जाणार असल्याचं समजतंय.

  • Share this:

18 मे : आगामी काळात कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक रद्द होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये पाहुण्या संघाच्या कर्णधाराला प्रथम फलंदाजी करायची आहे की गोलंदाजी याचं स्वातंत्र्य दिलं जाऊ शकतं. आयसीसीकडून याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान २८-२९ मे रोजी मुंबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेतला जाणार असल्याचं समजतंय.

कोणत्याही सामन्याआधी होणारी नाणेफेक ही बऱ्याचवेळा संघाचा निकाल ठरवत असते. कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेकीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे, यजमान संघ खेळपट्टीचं रुप पाहून प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी हे नाणेफेकीनंतर ठरवत असतो. मात्र आयसीसीच्या अंतर्गत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत अनेक प्रसंगांमध्ये, यजमान संघाच्या जमेच्या बाजू लक्षात ठेऊन खेळपट्टी बनवली जाते.

अशा प्रकारे काम करणं ही चुकीची गोष्ट नसली तरीही अनेकदा कसोटी सामने एकतर्फी होतात. 'कसोटी सामन्याची खेळपट्टी तयार करताना यजमान संघाचं मत विचारात घेतलं जाण हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. त्यामुळे बहुतांश सदस्यांनी नाणेफेकीऐवजी पाहुण्या संघाच्या कर्णधाराला गोलंदाजी किंवा फलंदाजी निवडण्याचा अधिकार द्यावा', असं मत व्यक्त केलं आहे.

 

First published: May 18, 2018, 8:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading