वर्ल्ड कपमधल्या 'त्या' नियमावरून न्यूझीलंडच्या खेळाडूनं ICCला केलं ट्रोल

वर्ल्ड कपमधल्या 'त्या' नियमावरून न्यूझीलंडच्या खेळाडूनं ICCला केलं ट्रोल

आयसीसीनं वर्ल्ड कपमधल्या वादग्रस्त नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.

  • Share this:

दुबई, 15 ऑक्टोबर: वर्ल्ड कपमध्ये अटीतटीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडचा पराभव केला. मात्र यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते आयसीसीच्या वादग्रस्त नियमाने. आयसीसीच्या या नियमामुळं न्यूझीलंडच्या हातातून वर्ल्ड गेला. दरम्यान आता आयसीसीनं याच नियमामध्ये मोठे बदल केले आहे.

वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. तेव्हाही सामना अनिर्णित राहिला. त्यावेळी आयसीसीच्या वतीनं इंग्लंड संघानं जास्त चौकार मारले म्हणून त्यांना विजेतेपद दिले. मात्रा आता या नियमामध्ये बदल करण्यात आले आहेत. दोन्ही संघांनी जर सुपर ओव्हरमध्ये देखील समान धावा केल्या तर पुन्हा सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हर तोपर्यंत खेळवली जाईल जोपर्यंत कोणताही एक संघ जिंकत नाही.

दरम्यान, आयसीसीनं हा नियम बदलल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूनं आयसीसीवर टीका केली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज जिम्मी निशामनं, "पुढचा अजेंडा : टायटॅनिकवर बर्फ आहे की नाही हे शोधण्यासाठी चांगली दुर्बिन शोधा", असे ट्रोल करणारे ट्वीट केले आहे.

वाचा-ICCने क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त नियमात केला बदल; आता होणार नाही अन्याय!

यावर न्यूझीलंडचा माजी फलंदाज कोच क्रेग मॅकमिलननं, "आयसीसीनं थोडा उशीर केला", असे म्हणत ट्रोल केले आहे. अंतिम सामन्यातील या निकालावर आजी-माजी क्रिकेटपटूंसह सामन्या चाहत्यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली होती. आता या वादग्रस्त नियमात आयसीसीने बदल केला आहे.

वाचा-अरेरे! 150 ओव्हर केली फिल्डिंग पण बॅंटिंगमध्ये पहिल्याच बॉलवर झाला आऊट

काय असेल नवा नियम

यापुढे सेमीफायनल अथवा फायनल सामन्यात दोन्ही संघांनी समान धावा केल्या तर सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल. दोन्ही संघांनी जर सुपर ओव्हरमध्ये देखील समान धावा केल्या तर पुन्हा सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हर तोपर्यंत खेळवली जाईल जोपर्यंत कोणताही एक संघ जिंकत नाही. यासंदर्भात आयसीसी बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. आयसीसी क्रिकेट समिती, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समितीच्या शिफारसीनंतर सुपर ओव्हर मधील नियम बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने सुपर ओव्हरच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय कोणत्या स्पर्धेपासून लागू करायचा याबाबत अद्याप काहीच ठरवण्यात आलेले नाही.

वाचा-चॅम्पियन खेळाडूनं ड्रेसिंग रूममध्ये केले असे कृत्य की सोडावं लागेल क्रिकेट

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 05:25 PM IST

ताज्या बातम्या