शिखर धवनचं शतक वाया, श्रीलंकेचा टीम इंडियावर शानदार विजय

शिखर धवनचं शतक वाया, श्रीलंकेचा टीम इंडियावर शानदार विजय

भारताने श्रीलंकेसमोर 321 धावांचा डोंगर उभा केला खरा पण लंकेनं टीमने एकीच बळ दाखवत 321 धावांचा डोंगर आरामात सर केला.

  • Share this:

08 जून :  चॅम्पियन ट्राफीमध्ये श्रीलंकनं टीम इंडियांच्या गोलंदाजांची धुलाई करत मॅच खिश्यात घातलीये. टीम इंडियाने दिलेलं 322 धावांचं आव्हान श्रीलंकनं टीमने 7 विकेट राखून भारताचा पराभव केला.

द ओवल मैदानावर रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवला.  शिखर धवनच्या शतकी खेळी, रोहित आणि धोनीच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने श्रीलंकेसमोर 321 धावांचा डोंगर उभा केला खरा पण लंकेनं टीमने एकीच बळ दाखवत 321 धावांचा डोंगर आरामात सर केला.

लंकनं टीमकडून दनुष्का गुणाथिलाकाने सर्वाधिक 76 रन्स केले तर कुशल मेंडिसने 89 रन्सची महत्वपूर्ण खेळी केली. दोघांच्या दमदार खेळीमुळे 159 रन्सची भक्कम भागिदारी केली. हीच भागिदारी लंकनं टीमच्या विजयाची पायाभरणी ठरली. तर कॅप्टन एँजेलो मैथ्यूनने नाबाद 52 रन्स करून टीमच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.

भारताची इनिंग

चॅम्पियन्स ट्राॅफीत ब गटात आज श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेऊन भारताला फलंदाजीसाठी आव्हान दिलं. ओपनिंग जोडी शिखर धवन आणि रोहित शर्माने साजेशीर खेळी करत भारताची दमदार सुरुवात केली.

रोहित शर्माने 79 बाॅल्समध्ये 78 रन्स केले. यात त्याने 6 चौकार आणि 3 सिक्स लगावले. शिखर धवनने 128 बाॅल्समध्ये 125 रन्स ठोकले. यात त्याने तब्बल 15 चौकार आणि 1 सिक्स लगावला. शिखरच्या या शतकी खेळीच्या बळावर भारताने 200 चे टप्पा पार केलाय.

शिखर आणि रोहित आऊट झाल्यानंतर कॅप्टन विराट कोहली मैदानात उतरला पण भोपळाही न फोडता आला तसा परत माघारी परतला. युवराज सिंगची जादूही फारशी पाहण्यास मिळाली नाही. युवराज अवघ्या 7 रन्सवर आऊट झाला.

धोनीने आपल्या नावाप्रमाणे खेळी करत 52 बाॅल्समध्ये 63 रन्सची खेळी पेश केली. यात त्याने 4 चौकार आणि 2 सिक्स लगावले. निर्धारीत 50 ओव्हर्समध्ये भारताने 6 गडी बाद  321 रन्स केले. लंकेकडून लसिथ मलिंगाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर सुरनगा लाकमल, थिसारा, नुवान प्रदीप आणि अशेल गुनरतनने प्रत्येक 1 विकेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 11:05 PM IST

ताज्या बातम्या