• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ICC चा मोठा निर्णय, भारतीय उद्योगपतीवर दोन वर्षांची बंदी

ICC चा मोठा निर्णय, भारतीय उद्योगपतीवर दोन वर्षांची बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बुधवारी एका भारतीय उद्योगपतीवर 2 वर्षांची बंदी घातली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 एप्रिल : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बुधवारी एका भारतीय उद्योगपतीवर 2 वर्षांची बंदी घातली. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दीपक अग्रवाल असं बंदी घातलेल्या उद्योगपतीचे नाव आहे. संयुक्त अरब अमिरातीत 2018 मध्ये झालेल्या टी20 लीग स्पर्धेत ते एका संघाचे मालक होते. त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा स्वीकार केल्यानंतर आयसीसीने कारवाईचा निर्णय घेतला. दोन वर्षांच्या बंदीमध्ये सहा महिन्यांच्या निलंबनाच्या शिक्षेचाही समावेश आहे. दीपक अग्रवाल हे काही काळ टी10 लीगमध्ये सिंधीजचे मालक होते. त्यांनी  अज्ञात व्यक्तीच्या मदतीने पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. मिस्टर एक्स असंही त्या व्यक्तीला संबोधलं जात होतं.  आयसीसीने म्हटल्यानुसार, अग्रवाल यांनी मिस्टर एक्सला एकमेकांमध्ये झालेले मेसेज डिलीट करण्यास सांगितले. तसंच एसीयूच्या चौकशीमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्याचा नंबरही डिलीट केला. पाहा VIDEO : RCBची साथ सोडणार विराट? कॅप्टन कोहलीलं स्वत: दिलं उत्तर तपासामध्ये अडथळा आणल्याचा आरोपही अग्रवाल यांच्यावर कऱण्यात आला आहे. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अग्रवाल यांनी आमच्या तपासात अडथळा आणला. तसंच अनेक वेळा दिरंगाई करण्याचा प्रयत्न केला. हे आरोप त्यांनी मान्य करून तपासात सहकार्य करू असंही म्हटलं आहे. त्याचा परिणाम शिक्षेवरही झाल्याच आयसीसीने सांगितलं. हे वाचा : HBD Rohit: रोहित शर्माची कोलकाता शहरातली ही भानगड माहीत आहे का? आयसीसीच्या आचारसंहिता 2.4.7 कलमानुसार अग्रवाल यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, माहिती नष्ट करणे किंवा लपवणे हा गुन्हा आहे. हे वाचा : क्रिकेटपटूवर बंदीची कारवाई, पत्नीचा VIDEO होतोय व्हायरल? संपादन - सूरज यादव
  Published by:Suraj Yadav
  First published: