मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /दोन क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, ICC ने घातली 8 वर्षांची बंदी

दोन क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, ICC ने घातली 8 वर्षांची बंदी

आयसीसीने (ICC) टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये फिक्सिंग केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन खेळाडूंवर 8 वर्षांची बंदी घातली आहे. युएईचे दोन खेळाडू मोहम्मद नवीद (Mohammad Naveed) आणि शेमान अनवर बट (Shaiman Anwar Butt) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 16 मार्च : आयसीसीने (ICC) टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये फिक्सिंग केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन खेळाडूंवर 8 वर्षांची बंदी घातली आहे. युएईचे दोन खेळाडू मोहम्मद नवीद (Mohammad Naveed) आणि शेमान अनवर बट (Shaiman Anwar Butt) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या एन्टी करप्शन ट्रिब्युनलने या दोन्ही खेळाडूंनी आयसीसीच्या आचार संहितेचं उल्लंघन केलं आणि ते दोषी आढळल्याचं सांगितलं. या दोघांच्या बंदीची सुरूवात 16 ऑक्टोबर 2019 पासून सुरू झाली आहे. त्याचवेळी हे प्रकरण समोर आलं होतं. ही कारवाई झाल्यानंतर या दोघांना युएईमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायरमधून बाहेर करण्यात आलं होतं.

नवीद टीमचा कर्णधार होता, तसंच तो देशासाठी सर्वाधिक विकेट घेणारा बॉलरही होता. तर अनवर युएईचा ओपनर होता. दोन्ही खेळाडूंकडे 70 आंतरराष्ट्रीय मॅचचा अनुभव होता. या कारवाईनंतर आयसीसीच्या इंटिग्रिटी युनिटचे जनरल मॅनेजर एलेक्स मार्शल म्हणाले, 'नवीद आणि शेमान यांच्याकडे युएईकडून खेळण्याचा अनुभव होता. पण ते दोघं भ्रष्टाचाराच्या मार्गाने गेले. या दोघांनी त्यांचे सहकारी युएई क्रिकेट आणि सगळ्या क्रीडा प्रेमींसोबत विश्वासघात केला. या खेळाडूंवर कारवाई झाल्यामुळे बाकीच्या खेळाडूंनाही इशारा मिळेल. नावेद याआधी टी-10 लीगमध्येही फिक्सिंगच्या आरोपात फसला होता.'

31 वर्षांच्या मोहम्मद नवीदने 39 वनडेमध्ये 53 विकेट घेतल्या होत्या, तर 31 टी-20 मध्ये त्याला 37 विकेट मिळाल्या होत्या. दुसरीकडे शेमान अनवर बटने 40 वनडेमध्ये 31 च्या सरासरीने 1219 रन केले होते. याचसोबत त्याला 32 टी-20 मॅचमध्ये 971 रन करता आले होते. त्याने एक शतक आणि 6 अर्धशतकंही केली होती. लेग स्पिनर असलेल्या शेमानला वनडेमध्ये 6 विकेटही मिळाल्या होत्या.

First published:
top videos

    Tags: Cricket, Icc