ICC पुरस्कारामध्ये रोहित शर्मा हिट, कोहलीचे स्पेशल कौतुक

ICC पुरस्कारामध्ये रोहित शर्मा हिट, कोहलीचे स्पेशल कौतुक

ICC पुरस्कारात रोहित शर्माने बाजी मारली असून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दीपक चाहर यांचाही गौरव करण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जानेवारी : आयसीसीने बुधवारी पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये भारताचा फलंदाज रोहित शर्माने बाजी मारली असून विराट कोहली आणि दीपक चाहरलासुद्धा पुरस्कार मिळाला आहे. रोहित शर्माला 2019 मधील कामगिरीसाठी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 9 सामन्यात 5 शतकांसह 648 धावा केल्या होत्या. त्याशिवाय वर्षभरात त्याने 28 सामन्यात 1490 धावा केल्या आहेत.

भारताचा कर्णधार विराट कोहलीला त्याच्या खिलाडुवृत्तीसाठी गौरवण्यात आलं आहे. त्याला स्पिरीट ऑफ द इयर अॅवॉर्ड देण्यात आला आहे. वर्ल्ड कपवेळी स्मिथला प्रेक्षकांनी चेंडू छेडछाड प्रकरणावरून चिडवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोहलीने प्रेक्षकांना स्मिथला चिडवण्याऐवजी त्याच्यासाठी टाळ्या वाजवा असं सांगितलं होतं.

रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरला टी20 चा परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. चाहरने बांगलादेशविरुद्ध नागपूर टी20 सामन्यात फक्त 6 धावा देत हॅटट्रिकसह 7 गडी बाद केले होते. भारताकडून टी20 मध्ये हॅटट्रीक करणारा पहिला गोलंदाज आहे.

The XI making up the Test Team of the Year मध्ये भारताच्या दोघांची वर्णी लागली आहे. यात मयंक अग्रवाल आणि विराट कोहलीचा समावेश आहे.

ऋषभ पंत रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली, चेंडू डोक्याला लागल्याने आली होती भोवळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2020 12:48 PM IST

ताज्या बातम्या