मुंबईकराने मिळवून दिला अमेरिकेला वनडे संघाचा दर्जा!

कॅप्टन ऑफ अमेरिका असलेल्या 'या' खेळाडूने भारताकडून 2010 अंडर 19 वर्ल्ड कप गाजवल्यानंतर 2013 च्या रणजीतही चमक दाखवली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 06:23 PM IST

मुंबईकराने मिळवून दिला अमेरिकेला वनडे संघाचा दर्जा!

वॉशिंग्टन, 25 एप्रिल : युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या क्रिकेट संघाला आयसीसीने एकदिवसीय संघाचा दर्जा देण्यात आला. नामबियात झालेल्या WCL डिव्हिजन 2 स्पर्धेतील विजयानंतर अमेरिकेच्या संघाला एकदिवसीय दर्जा प्रदान केला. या स्पर्धेत अमेरिकेने हाँगकाँगला 84 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात अमेरिकेने दिलेल्या 281 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगला 196 धावांपर्यंतच मजल मारता आली.दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 8 बाद 280 धावा केल्या. यात झेव्हियर मार्शलने 154 चेंडूत 100 धावांची खेळी केली. याशिवाय स्टीव्हन टेलरने 88 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. अमेरिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगची आघाडीची फळी कोलमडली. एजाज खान आणि एहसान खान या तळाच्या फलंदाजांनी 8 व्या विकेटसाठी 66 धावांची भागिदारी केल्याने त्यांना 196 धावांपर्यंत मजल मारता आली.


Loading...


विशेष म्हणजे अमेरिकेच्या संघाचे नेतृत्व मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकर याच्याकडे आहे. त्याने 5 षटके गोलंदाजी करताना फक्त 14 धावा देत 1 गडी बाद केला. त्याच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय संघाचा दर्जा मिळवला. ही कामगिरी अभिमानास्पद असून एक संघ म्हणून उत्तम कामगिरी केल्याचं समाधान आहे असं सौरभने म्हटलं.

अमेरिकेच्या एकदिवसीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळणाऱ्या सौरभने 2010 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. मुळचा मुंबईचा असलेल्या सौरभ नेत्रावळकरने 2013 ला रणजीतही मुंबईचे प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यानंतर 2015 ला उच्च शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेला गेला. तेव्हा त्याने क्रिकेटला रामराम केला तरी त्याच्यातला क्रिकेटपटू त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. विद्यापीठात शिक्षण घेत त्याने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरूवात केली. गेल्याच वर्षी त्याची अमेरिकेच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली.

मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...