मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICC Tournaments: टीम इंडियाला आयसीसीने दिली मोठी जबाबदारी

ICC Tournaments: टीम इंडियाला आयसीसीने दिली मोठी जबाबदारी

ICC Head Quarters

ICC Head Quarters

आयसीसीने (ICC) 2024 ते 2031 दरम्यान होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांच्या यजमानांची घोषणा केली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: आयसीसीने (ICC) 2024 ते 2031 दरम्यान होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांच्या यजमानांची घोषणा केली आहे. भारताकडे 3 मोठ्या स्पर्धांची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयसीसी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला दीर्घ काळानंतर मिळाले आहे. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे.

भारतात 2026 टी-20 वर्ल्डकप, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 वन डे वर्ल्डकप होणार आहे. 2023 चा वन डे वर्ल्डकपही भारतात होणार असल्याची माहिती आहे.

आयसीसीने मंगळवारी स्पर्धेचे ठिकाण जाहीर केले. 2024 मध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला ही जबाबदारी देण्यात आली आहे. २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होऊ शकतो. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे, तर 2026 मध्ये T20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये होणार आहे.

नामिबियात वन डे वर्ल्डकप

आयसीसीने 2027 मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्डकपची जबाबदारी झिम्बाब्वे, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेकडे दिली आहे. 2028 मध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. नुकतेच UAE मध्ये झालेल्या T20 वर्ल्डकपचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकावले आहे. 2029 मध्ये आयसीसी स्पर्धा पुन्हा एकदा भारतात परतणार आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार आहे.

दर 2 वर्षांनी T20 वर्ल्डकप

आयसीसी दर 2 वर्षांनी T20 वर्ल्डकप आयोजित करेल. 2030 मध्ये होणारा T20 वर्ल्डकप इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये खेळवला जाईल. त्याच वेळी, 2031 मध्ये, वन डे वर्ल्डकप फक्त भारतातच आयोजित केला जाईल. एकूण 12 देशांमध्ये 8 स्पर्धा होणार आहेत.

First published:

Tags: BCCI, Icc, T20 world cup, Team india