Home /News /sport /

ICC ने जाहीर केली दशकातली सर्वोत्तम टीम, या भारतीयांना संधी

ICC ने जाहीर केली दशकातली सर्वोत्तम टीम, या भारतीयांना संधी

आयसीसी (ICC) ने या दशकातल्या सर्वोत्तम टी-20, वनडे आणि टेस्ट टीमची घोषणा केली आहे. आयसीसीच्या या टी-20 मध्ये चार भारतीय, वनडे टीममध्ये तीन भारतीय आणि टेस्ट टीममध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे.

    दुबई, 27 डिसेंबर : आयसीसी (ICC) ने या दशकातल्या सर्वोत्तम टी-20, वनडे आणि टेस्ट टीमची घोषणा केली आहे. आयसीसीने या टीमची घोषणा करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांसाठी पोलचं आयोजन केलं होतं. या पोलवरून ही टीम बनवण्यात आली आहे. आयसीसीच्या या टी-20 मध्ये चार भारतीय, वनडे टीममध्ये तीन भारतीय आणि टेस्ट टीममध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. तर दुसरीकडे आयसीसीने महिला टीमचीही घोषणा केली आहे. महिला टी-20 टीममध्ये दोन भारतीय आणि महिला वनडे टीममध्येही दोन भारतीयांची निवड झाली आहे. वनडे आणि टी-20 टीमचं नेतृत्व एमएस धोनीला, तर टेस्ट टीमचं नेतृत्व विराट कोहली याला देण्यात आलं आहे. पुरुष टी-20 टीम रोहित शर्मा, क्रिस गेल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा महिला टी-20 टीम एलिसा हिली, सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स, मेग लॅनिंग (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्टेफनी टेलर, डीनद्रा डॉटिन, एलिस पेरी, अन्या श्रुबसोल, मेगन स्चूट, पूनम यादव पुरुष वनडे टीम रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहीर, लसिथ मलिंगा महिला वनडे टीम एलिसा हिली, सुझी बेट्स, मिताली राज, मेग लॅनिंग (कर्णधार), स्टेफनी टेलर, सराह टेलर, एलीस पेरी, डेन व्हॅन नायकर्क, मारीझेन कॅप, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद पुरुष टेस्ट टीम एलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, आर.अश्विन, डेन स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अंडरसरन
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या