मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडिया पुढच्या वर्षी खेळणार दोन World Cup, दोन्ही वेळा होणार IND vs PAK लढत!

टीम इंडिया पुढच्या वर्षी खेळणार दोन World Cup, दोन्ही वेळा होणार IND vs PAK लढत!

टीम इंडिया (Team India) पुढच्या वर्षी दोन वर्ल्ड कप (World Cup) खेळणार आहे. बुधवारी आयसीसीने अंडर-19 टी-20 वर्ल्ड कपच्या (Under 19 T20 World Cup) वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यामुळे इकडेही चाहत्यांना भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना बघायला मिळू शकतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 17 नोव्हेंबर : टीम इंडिया (Team India) पुढच्या वर्षी दोन वर्ल्ड कप (World Cup) खेळणार आहे. बुधवारी आयसीसीने अंडर-19 टी-20 वर्ल्ड कपच्या (Under 19 T20 World Cup) वेळापत्रकाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे. एकूण 16 टीम अंडर-19 टी-20 वर्ल्ड कप खेळतील, त्यामुळे इकडेही चाहत्यांना भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना बघायला मिळू शकतो. 2022 साली ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपही खेळवला जाणार आहे. भारत-पाकिस्तानच्या टीम थेट सुपर-12 मध्ये क्वालिफाय झाल्या आहेत.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये 16 टीम मैदानात उतरणार आहेत. या टीममध्ये 48 सामने होतील. ग्रुप-बी मध्ये टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका आयर्लंड आणि युगांडा आहे, तर ग्रुप-सीमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि पपुआ न्यू गिनीच्या टीम आहेत. ग्रुप-एमध्ये बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा, युएई आणि ग्रुप-डीमध्ये वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि स्कॉटलंड आहेत. अंडर-19 टी-20 वर्ल्ड कपला 14 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे, तर 5 फेब्रुवारीला फायनल खेळवली जाणार आहे. भारत-पाकिस्तान नॉकआऊटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळू शकतात.

अंडर-19 वर्ल्ड कप 1988 पासून खेळवला जात आहे. भारताने सर्वाधिक 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. विराट कोहलीलाही कर्णधार म्हणून एकदा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकता आला आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या 13 सिझन झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला 3, पाकिस्तानला 2 तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला प्रत्येकी 1-1 वेळा विजय मिळाला आहे. 2020 साली झालेल्या अखेरच्या अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा पराभव केला होता.

अंडर-19 वर्ल्ड कपमधून अनेक स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आले आहेत. यामध्ये विराट कोहली, बाबर आझम, जो रूट, केन विलियमसन, शिमरन हेटमायर यांचा समावेश आहे. भारताने 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वात, 2008 साली विराट कोहली, 2012 साली उन्मुक्त चंद आणि 2018 साली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup