मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

इज्जतच काढली राव! T20 World Cup जिंकणाऱ्या टीमला मिळणार IPL च्या एका खेळाडूपेक्षा कमी पैसे

इज्जतच काढली राव! T20 World Cup जिंकणाऱ्या टीमला मिळणार IPL च्या एका खेळाडूपेक्षा कमी पैसे

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, त्याआधी आयसीसीने (ICC) विजेत्या टीमला देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा केली आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 10 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, त्याआधी आयसीसीने (ICC) विजेत्या टीमला देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला आयसीसी 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 12 कोटी रुपये देणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी, पॅट कमिन्स आणि क्रिस मॉरिस या खेळाडूंना आयपीएलचा (IPL) एक मोसम खेळून यापेक्षा जास्त पैसे मिळतात. टी-20 वर्ल्ड कपच्या उपविजेत्या टीमला 8 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 6 कोटी रुपये मिळणार आहेत.

आयपीएल जिंकणाऱ्या टीमला बक्षिसाची रक्कम म्हणून 10 कोटी रुपये दिले जातात, कोरोना महामारीमुळे ही रक्कम कमी करण्यात आली आहे. याआधी आयपीएल जिंकल्यानंतर टीमला तब्बल 20 कोटी रुपये मिळायचे.

बक्षिसाच्या रकमेशिवाय आयसीसीने वर्ल्ड कपसाठीच्या ड्रिंक्स ब्रेकच्या वेळाचीही घोषणा केली आहे. एका इनिंगमध्ये ड्रिंक्स ब्रेकसाठी 2 मिनीट 30 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे. तसंच सुपर-12 नंतर प्रत्येक विजयासाठी बोनस अवॉर्डही देण्यात येणार आहे. 2016 साली खेळवल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही असंच केलं गेलं होतं. सुपर-12 मध्ये होणाऱ्या एकूण 30 सामन्यांमध्ये 40 हजार डॉलर (जवळपास 1 कोटी 20 लाख रुपये) पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहेत.

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोन्ही टीमना 4 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 3 कोटी रुपये मिळतील. यंदाच्या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 42 कोटी रुपये टीमना पुरस्काराची रक्कम म्हणून दिली जाईल. सुपर-12 स्टेजला बाहेर जाणाऱ्या टीमना 70 हजार डॉलर (52 लाख रुपये) दिले जातील. राऊंड लीगच्या 12 मॅचमध्ये 40 हजार डॉलर प्रत्येक सामन्यासाठी दिले जातील. पहिल्याच राऊंडला बाहेर जाणाऱ्या चारही टीमना 40-40 हजार डॉलर (30 लाख रुपये) देण्यात येतील.

बांगलादेश, आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स, पपुआ न्यू गिनी, ओमान, श्रीलंका आणि स्कॉटलंड राऊंड-1 मध्ये खेळतील. तर भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज आधीच सुपर-12 मध्ये पोहोचल्या आहेत.

First published:

Tags: IPL 2021, T20 world cup, Team india