मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup मध्ये अफगाणिस्तान खेळणार का नाही? ICC ने दिली Update

T20 World Cup मध्ये अफगाणिस्तान खेळणार का नाही? ICC ने दिली Update

17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे, पण अजूनही अफगाणिस्तानच्या (Afghanistan) सहभागाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयसीसीने (ICC) मात्र टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान सहभागी होईल, असं आयसीसीचे कार्यवाहक सीईओ ज्योफ अलारडाइस यांनी सांगितलं.

पुढे वाचा ...

मुंबई, 10 ऑक्टोबर : 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे, पण अजूनही अफगाणिस्तानच्या (Afghanistan) सहभागाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयसीसीने (ICC) मात्र टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान सहभागी होईल, असं आयसीसीचे कार्यवाहक सीईओ ज्योफ अलारडाइस यांनी सांगितलं. अडचणीत सापडलेल्या अफगाणिस्तानमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर गोष्टी कशा समोर येतात, त्यावर बारीक लक्ष ठेवलं जाईल, असं अलारडाइस म्हणाले. अफगाणिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये तालिबानचा झेंडा वापरला, तर आयसीसी त्यांच्यावर बंदी घालू शकते, असं सांगण्यात येत होतं.

अफगाणिस्तान आयसीसीचा पूर्ण सदस्य आहे आणि टीम आता वर्ल्ड कपची तयारी करत आहे. ते ग्रुप स्टेजमध्ये खेळणार आहेत, असं अलारडाइस यांनी स्पष्ट केलं. तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डात बदलही करण्यात आले. मागच्या महिन्यात हामीद शिनवारीऐवजी नसीब जादरान खान यांना बोर्डाचं सीईओ करण्यात आलं.

'अफगाणिस्तानमध्ये ऑगस्ट महिन्यात सत्ता परिवर्तन झालं, तेव्हापासून आम्ही बोर्डाच्या संपर्कात आहोत. क्रिकेटला प्रोत्साहन देणं ही आमची पहिली प्राथमिकता आहे. तिकडे गोष्टी कशा पुढे जात आहेत, ते आम्ही पाहत आहोत', असं अलारडाइस पत्रकार परिषदेत म्हणाले. अफगाणिस्तान आयसीसीचा पूर्ण सदस्य आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये ते ग्रुप-2 मध्ये आहेत, ज्यात भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या टीमही आहेत.

टी-20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान क्रिकेट टीममध्ये कतारमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तानची टीम युएईला रवाना होणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वेचे माजी कर्णधार आणि इंग्लंडचे माजी प्रशिक्षक एण्डी फ्लॉवर यांना टी-20 वर्ल्ड कपसाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे.

First published:

Tags: Afghanistan, T20 world cup