मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनी ICC च्या दशकाच्या टी-20 टीममध्ये , या भारतीय खेळाडूनेच घेतला आक्षेप

धोनी ICC च्या दशकाच्या टी-20 टीममध्ये , या भारतीय खेळाडूनेच घेतला आक्षेप

आयसीसी (ICC) ने काहीच दिवसांपूर्वी दशकातल्या सर्वोत्तम वनडे, टी-20 आणि टेस्ट टीमची घोषणा केली. यातल्या टी-20 आणि वनडे टीमचं नेतृत्व एमएस धोनी (MS Dhoni) कडे सोपवण्यात आलं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 31 डिसेंबर : आयसीसी (ICC) ने काहीच दिवसांपूर्वी दशकातल्या सर्वोत्तम वनडे, टी-20 आणि टेस्ट टीमची घोषणा केली. यातल्या टी-20 आणि वनडे टीमचं नेतृत्व एमएस धोनी (MS Dhoni) कडे सोपवण्यात आलं. तर विराट कोहली (Virat Kohli) याला टेस्ट टीमचं कर्णधार करण्यात आलं. आयसीसीच्या टी-20 टीममध्ये धोनीशिवाय कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनाही संधी देण्यात आली आहे. टीमच्या घोषणेनंतर अनेकांनी भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं, पण भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने टी-20 टीमच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

टी-20 टीममध्ये धोनीची निवड पाहून हैराण झालो, खासकरून जॉस बटलर सारख्या टी-20 स्पेशलिस्टची या टीममध्ये निवड न झालेली पाहून आश्चर्य वाटलं असं आकाश चोप्रा म्हणाला.

'तुम्ही दशकातल्या टी-20 टीमची निवड करत असाल तर भारताने या दशकात काहीही जिंकलं नाही, तसंच धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली नाही. आपण एक टी-20 टीम बनवत आहोत आणि त्यात जॉस बटलरसारखे खेळाडू नाहीत,' अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली.

मागच्या 10 वर्षात धोनीने 73 टी-20 मॅचमध्ये 45.23 च्या सरासरीने 1,176 रन केले. यामध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर 56 रन होता.

आयसीसीची दशकातली टी-20 टीम

रोहित शर्मा, क्रिस गेल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा

First published: