ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू म्हणतो, 'भारतात टी-20 वर्ल्ड कप होऊ नये, हाच कॉमन सेन्स'

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू म्हणतो, 'भारतात टी-20 वर्ल्ड कप होऊ नये, हाच कॉमन सेन्स'

भारतातल्या कोरोनाच्या या संकटात टी-20 वर्ल्ड कप (ICC T-20 World Cup) खेळवला जाऊ नये, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी केली आहे.

  • Share this:

मेलबर्न, 28 एप्रिल : भारतामध्ये कोरोना व्हायरसने (Corona Virus) थैमान घातलं आहे. मागच्या 7 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत, तसंच दररोज अडीच हजारांच्यावर मृत्यू होत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनही मिळत नसल्याचं चित्र आहे. भारतातल्या कोरोनाच्या या संकटात टी-20 वर्ल्ड कप (ICC T-20 World Cup) खेळवला जाऊ नये, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी केली आहे.

भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. 9 शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याची बीसीसीआयची तयारी आहे. भारतातली कोरोनाची स्थिती सुधारली नाही, तर बायो-बबलमध्येच प्रेक्षकांशिवाय वर्ल्ड कप खेळवला जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयने (BCCI) वर्ल्ड कपच्या आयोजनाची तयारी केली असली, तरी इयन चॅपल यांनी मात्र भारतात किंवा आशियाई देशात कुठेच वर्ल्ड कप होऊ नये, अशी मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आशियाई देशांपेक्षा दुसरीकडे कुठेतरी ही स्पर्धा खेळवण्यात यावी, हाच कॉमन सेन्स असल्याचं चॅपल म्हणाले. भारतात टी-20 वर्ल्ड कप आयोजित करता येत नसेल, तर आयसीसीसाठी युएई हा बॅक अप प्लान आहे. भारतातली परिस्थिती खराब झाली किंवा सुधारली नाही, तसंच इतर देशांनी प्रवास करण्यास नकार दिला तर युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कप होऊ शकतो.

भारतामध्ये सध्या आयपीएल स्पर्धा सुरू आहे. कोरोनामुळेच सहा शहरांमध्ये बायो-बबलमध्ये आयपीएल खेळवली जात आहे. कोरोना संकटात आयपीएल खेळवण्यात येऊ नये, अशी मागणीही अनेकांनी केली, तसंच काही खेळाडूंनी भीतीमुळे आयपीएल अर्ध्यातच सोडण्याचाही निर्णय घेतला.

भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन (R Ashwin) याने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. अश्विनच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याने पुढची स्पर्धा न खेळण्याचं ठरवलं. याचसोबत राजस्थान रॉयल्सचा लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone), एन्ड्रयू टाय (Andrew Tye) तसंच आरसीबीचे एडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांनीही कोरोनाच्या भीतीने माघार घेतली.

Published by: Shreyas
First published: April 28, 2021, 6:22 PM IST

ताज्या बातम्या