VIDEO: विजयानंतर विराटचा मोठा खुलासा, म्हणाला 'या' भारतीय गोलंदाजाची वाटते भीती

VIDEO: विजयानंतर विराटचा मोठा खुलासा, म्हणाला 'या' भारतीय गोलंदाजाची वाटते भीती

ऐतिहासिक विजयानंतर बोलताना भारतीय कर्णधार विराट कोहलीनं एक खुलासा केला आहे.

  • Share this:

मेलबर्न, 30 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतानं 137 धावांनी विजय मिळवला आहे. भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1नं आघाडी घेतली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर बोलताना भारतीय कर्णधार विराट कोहलीनं एक खुलासा केला आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दमदार कामगिरी केली. कर्णधार विराट कोहलीनेही बुमराहचं तोंड भरून कौतुक केलं आहे. विराट म्हणाला की, 'बुमराहची गोलंदाजी पाहता येणाऱ्या काळात जगभरातील फलंदाजांसाठी तो धोकादायक ठरू शकतो. बुमराहच्या अशी गोलंदाजी पाहता मलाही त्याच्या गोलंदाजीवर खेळू वाटत नाही.'दरम्यान, तिसऱ्या कसोटीत बुमराहने 9 विकेट्स मिळवत सामनावीराचा किताब पटकावला. दुसऱ्या डावात बुमराह आणि जाडेजानं प्रत्येकी तीन गडी बाद केले.मेलबर्नच्या मैदानातील या 'बॉक्सिंग डे' कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा डाव 261 धावांत आटोपला.

ऑस्ट्रेलियाच्या आघाडीचे फलंदाज मैदानात फार काळ तग धरू शकले नाहीत. पण कांगारुंच्या तळातील फलंदाजांनी भारताला विजयसाठी पाचव्या दिवसाची वाट पाहायला लावली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं सर्वाधिक 63 धावा केल्या. तर भारताच्या वतीने बुमराहने सामन्यात 9 गडी बाद केले.


VIDEO: 'याद रखो मोदीजी', पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर रावण आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2018 11:29 AM IST

ताज्या बातम्या