• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • '...तर मी मृत्यूला पसंत करेन', ट्रोलिंगनंतर Mohammed Shami चा 'तो' Video व्हायरल

'...तर मी मृत्यूला पसंत करेन', ट्रोलिंगनंतर Mohammed Shami चा 'तो' Video व्हायरल

Mohammad Shami

Mohammad Shami

सतत होणाऱ्या टीकांनंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammad Shami) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. त्यामध्ये त्याने ...तर मी मृत्यूला पसंती दर्शवेन' अशी भावना व्यक्त केली आहे.

 • Share this:
  दुबई, 28 ऑक्टोबर: टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) दारूण पराभव केला. यानंतर काही ट्रोलर्सनी मोहम्मद शमीने (Mohammad Shami) मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप केले, तसंच त्याच्यावर अनेकांनी धर्मावरूनही टीका केली. त्यानंतर भारतासह पाकिस्तान संघातील खेळडूंनी त्याला पाठिंबा दर्शवला. अशातच, मोहम्मद शमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. त्यामध्ये त्याने ' देशाची फसवणूक करण्याचा प्रश्न मनात आला तर मी मृत्यूला पसंती दर्शवेन' अशी भावना व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर शमीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये तो देशाची फसवणूक करण्याऐवजी देशासाठी मरणं पसंत करेन असें म्हटलं होतं. 2018 मध्ये मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्याची पत्नी हसीन जहाँने या गोलंदाजावर घरगुती हिंसाचार, हुंडाबळी, मॅच फिक्सिंग असे गंभीर आरोप केले होते. यानंतर शमीने पत्नीच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने "सर्वात मोठा प्रश्न माझ्यावर निर्माण झाला आहे. चुकून जरी माझ्या मनात देशाची फसवणूक करण्याचा प्रश्न मनात आला तर मी मृत्यूला पसंती दर्शवेन' पण देशाला धोका देऊ शकत नाही.' असे शमीने म्हटले आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@_cricket.special_)

  तसेच, मी भारतीय सैन्याचा आदर करतो. मी खोटारडं असल्याचे सिद्ध झाले तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. असेदेखील त्याने त्यावेळी म्हटले होते. मोहम्मद शमीनं पाकिस्तानच्या इनिंगमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली. तो बॉलिंगला आला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 17 रनची आवश्यकता होती. पाकिस्ताननं 5 बॉलमध्येच हे रन पूर्ण करत टीम इंडियाला पराभूत केलं. त्यानंतर काही फॅन्सनी शमीवर टीका करत त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवरील या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानकडून मोठ्या पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पुनरागमन करू इच्छित आहे. दोन्ही संघांमधील हा बहुप्रतिक्षित सामना 31 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: