मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /...तर आज मी पेट्रोल पंपावर काम करत असतो; खासगी आयुष्यावर पांड्याचा खुलासा

...तर आज मी पेट्रोल पंपावर काम करत असतो; खासगी आयुष्यावर पांड्याचा खुलासा

तर आज मी पेट्रोल पंपवर काम करत असतो; खासगी आयुष्यावर पांड्याचा खुलासा

तर आज मी पेट्रोल पंपवर काम करत असतो; खासगी आयुष्यावर पांड्याचा खुलासा

अनफीट फिटनेसमुळे सध्या चर्चेत असणारा टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं आहे.

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) सध्या क्रिकेटमधील सर्वात खराब काळ सुरू आहे. त्याच्या अनफीट फिटनेसमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या हार्दिक पांड्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं आहे.

हार्दिक पांड्याचा बडोद्यातील छोट्या घरापासून मुंबईतील आलिशान घरापर्यंतचा प्रवास प्रेरणा देणारा आहे. त्याने आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या बळावर भारतासाठीच नव्हे तर आयपीएल फ्रँचायजी मुंबई इंडियन्स संघासाठी देखील महत्वाची भूमिका बजावली आहे.

T20 World Cup: अडचणीत सापडलेल्या हार्दिक पांड्याला आठवला धोनी! म्हणाला...

 पांड्याने इएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या एका मुलाखतीत बऱ्याच गोष्टींसंबंधी खुलासा केला आहे.

जे काही सुरू आहे ते समजून घेण्यासाठी तुम्हाला दृढ मनाची आवश्यकता असते. मी आणि कृणाल हे समजण्यास सक्षम आहोत की, आमच्याकडे पैसा आहे. परंतु आम्ही नेहमी सुनिश्चित करतो की, आम्ही आमचे पाय जमिनीवरून वर उचलणार नाही. तुम्हाला वाटत असेल की, मी हवेत उडत आहे वगैरे. परंतु मला माहित आहे की, माझे पाय जमिनीवर आहेत. पैसा चांगला आहे भाऊ, हे खूप काही बदलू शकतं. मी देखील त्यापैकीच एक आहे. नाहीतर मी देखील पेट्रोल पंपवर काम करत असतो. मी हे मजेने बोलत नाहीये, माझ्या कुटुंबाला चांगले आयुष्य मिळावे या गोष्टीला मी अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे मी आज इथे आहे.

तसेच हार्दिक पंड्याने आणखी एक मोठा खुलासा देखील केला की, पैसाच क्रिकेटपटूला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करत असतो. याबाबत बोलताना तो म्हणाला, “2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी माझी भेट एका अशा व्यक्तीसोबत झाली होती, ज्याने म्हटले होते की, ‘युवा खेळाडूंनी पैस्याकडे जास्त आकर्षित होऊ नये.’ मी या गोष्टीवर सहमत नव्हतो. कारण जेव्हा कुठल्या गावातील किंवा छोट्या शहरातील मुलाला करार मिळत असतो. त्यावेळी तो त्याचा वापर स्वतःसाठी न करता, आई – वडील आणि नातेवाईकांची सेवा करण्यासाठी करत असतो.”

भारत -पाकिस्तान मॅचपूर्वीच भिडले क्रिकेटर, भज्जीनं केली शोएबची बोलती बंद

पैशामुळे फरक पडतो. आणि हे प्रेरणा देखील देत असते. हा गैरसमज आहे की, लोकांनी पैशाबद्दल बोलू नये म्हणतात. मी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. जर पैसा नसेल तर मला नाही वाटत कितीतरी लोक क्रिकेट खेळतील, असे मतही पांड्याने यावेळी व्यक्त केले.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (सोमवारी) वॉर्म अप मॅच होणार आहे. या मॅचमध्ये हार्दिक कसा खेळ खेळतो, विशेषत: बॉलिंग करतो का? याकडं टीम मॅनेजमेंटचं लक्ष असेल. या मॅचमध्ये तो यशस्वी झाला नाही तर पाकिस्तान विरुद्ध शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी मिळू शकते.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Hardik pandya, Krunal Pandya, T20 cricket