Home /News /sport /

'पुढच्या टेस्ट सीरिजला तो नसेल तर आश्चर्य वाटेल', मुंबईच्या खेळाडूबद्दल गावसकरांची भविष्यवाणी

'पुढच्या टेस्ट सीरिजला तो नसेल तर आश्चर्य वाटेल', मुंबईच्या खेळाडूबद्दल गावसकरांची भविष्यवाणी

टीम इंडियामध्ये (Team India) प्रवेश मिळवण्यासाठी अनेक युवा खेळाडू घाम गाळत आहेत. टीमचे सीनियर खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचं वय 30 पेक्षा जास्त झालं आहे. या सगळ्या खेळाडूंच्या फॉर्ममध्येही गेल्या काही काळात कमालीची घसरण झाली आहे, त्यामुळे आता निवड समिती पुढच्या पिढीला संधी द्यायचा विचार करू शकते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जून : टीम इंडियामध्ये (Team India)  प्रवेश मिळवण्यासाठी अनेक युवा खेळाडू घाम गाळत आहेत. टीमचे सीनियर खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचं वय 30 पेक्षा जास्त झालं आहे. या सगळ्या खेळाडूंच्या फॉर्ममध्येही गेल्या काही काळात कमालीची घसरण झाली आहे, त्यामुळे आता निवड समिती पुढच्या पिढीला संधी द्यायचा विचार करू शकते. नुकत्याच झालेल्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठीही नव्या दमाच्या खेळाडूंची निवड करण्यात आली. स्थानिक क्रिकेटमध्ये धमाका करणारा सरफराज खान (Sarfaraz Khan) चर्चेत आला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही तो लवकरच भारतीय टीममध्ये पदार्पण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 21 वर्षांचा सरफराज खान सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. रणजी ट्रॉफीच्या मोसमात त्याने मुंबईसाठी खोऱ्याने रन काढल्या. सरफराजच्या या फॉर्ममुळे मुंबई रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली. रणजी ट्रॉफीच्या या सिझनमध्ये सरफराजने 6 सामन्यांमध्ये 122.75 च्या सरासरीने 982 रन केले. यादरम्यान त्याने 4 शतकं आणि 2 अर्धशतकं केली, या कामगिरीमुळे त्याची भारतीय टेस्ट टीममध्ये निवड होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढच्या टेस्ट सीरिजमध्ये सरफराजची निवड झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं गावसकर म्हणाले आहेत. मिड डेमध्ये लिहिलेल्या कॉलममध्ये गावसकर म्हणाले, 'सरफराज खान त्याने केलेल्या जबरदस्त रन आणि शतकांमुळे टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी पुढे आला आहे. रहाणे टीममधून बाहेर आहे, तर पुजाराकडे स्कोअर करून टीममधलं स्थान वाचवण्याची शेवटची संधी आहे. सरफराजने टीम इंडियाच्या निवडीसाठीचा दरवाजा ठोठावला आहे. पुढच्या सीरिजमध्ये त्याचं नाव आलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ' ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टेस्टनंतर भारताची पुढची टेस्ट घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. दोन्ही देशांमध्ये होणारी टेस्ट सीरिज टी-20 वर्ल्ड कपनंतर होणार आहे. 4 टेस्ट मॅचच्या या सीरिजसाठी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी सरफराजने त्याचा दावा मजबूत केला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india

    पुढील बातम्या