मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'धोनीसोबतच्या मैत्रीमुळे टीम इंडियात', म्हणणाऱ्यांवर संतापला सुरेश रैना

'धोनीसोबतच्या मैत्रीमुळे टीम इंडियात', म्हणणाऱ्यांवर संतापला सुरेश रैना

डावखुरा आक्रमक बॅट्समन सुरेश रैनाने (Suresh Raina) आपल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला (Team India) अनेक सामने जिंकवले.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 जून : डावखुरा आक्रमक बॅट्समन सुरेश रैनाने (Suresh Raina) आपल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला (Team India) अनेक सामने जिंकवले. मधल्या फळीत खेळणाऱ्या सुरेश रैनाने अनेकवेळा कठीण परिस्थितीमध्ये रन केले. वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये रैना बराच काळ टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू होता, पण त्याला अनेकवेळा धोनीचा (MS Dhoni) मित्र असल्यामुळे टोमणेही सहन करावे लागले. या सगळ्या गोष्टींवर सुरेश रैनाने त्याच्या पुस्तकातून संताप व्यक्त केला आहे. धोनीसोबत मैत्री असल्यामुळेच आपण टीम इंडियामध्ये आहोत, असं बोललं जायंच, असं रैना त्याचं पुस्तक बिलिव्ह मध्ये म्हणाला आहे.

'धोनीला माहिती होतं, माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करून घ्यायची. मीही त्याच्यावर विश्वास ठेवला. आमची मैत्री आणि माझी टीम इंडियातली निवड या दोन गोष्टी जेव्हा जोडल्या जातात, तेव्हा खूप दु:ख होतं. प्रत्येकवेळी मी टीम इंडियामध्ये क्षमतेमुळे स्थान मिळवलं,' असं रैनाने सांगितलं.

धोनी आणि रैनाची मैत्री खूप जुनी आहे, हे दोघंही जवळपास एकत्रच टीम इंडियामध्ये आले. धोनीने 2004 साली आणि रैनाने 2005 साली टीम इंडियामध्ये पदार्पण केलं. या दोघांची मैत्री एवढी घट्ट आहे, की धोनीने 15 ऑगस्ट 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही वेळातच रैनानेही निवृत्तीची घोषणा केली.

रैनाने भारताकडून 226 मॅचमध्ये 35.31 च्या सरासरीने 5,615 रन केले, यामध्ये 5 शतकं आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 मध्ये त्याने 66 इनिंगमध्ये 29.18 च्या सरासरीने 1605 रन केले, त्याच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये एक शतकही आहे. रैनाने 18 टेस्टमध्ये एका शतकाच्या मदतीने 768 रनची खेळी केली.

First published:

Tags: Cricket, MS Dhoni, Suresh raina