Home /News /sport /

'मला रागही आला होता आणि नाराजही झालो होतो', सुपर ओव्हरबाबत ख्रिस गेलचा मोठा खुलासा

'मला रागही आला होता आणि नाराजही झालो होतो', सुपर ओव्हरबाबत ख्रिस गेलचा मोठा खुलासा

आता गेलनी याबाबत स्पष्ट केलं आहे

    दुबई, 19 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स आयपीएल टी-20 क्रिकेट सामना सहज जिंकता येत असतानाही हा सामना दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत लांबल्यामुळे क्रिस गेल नाराज होता अशी चर्चा सुरू आहे. पण आपण नाराज नसल्याचं गेलनी स्पष्ट केलं आहे. दुसऱ्या सुपर ओवर मध्ये 11 धावा करताना ख्रिस गेलने पहिल्या चेंडूवर एक षटकार मारला. त्यानंतर मयंक अग्रवालने सलग दोन चौकार मारत KXIP ला लागोपाठ दुसरा विजय मिळवून दिला. गेल म्हणाला, " नाही मी चिंताग्रस्त नव्हतो मी थोडा अधिक रागावलो होतो आणि थोडा नाराजही होतो, हा क्रिकेटचा खेळ आहे आणि यामध्ये अशा गोष्टी घडत असतात." असे ख्रिस गेलने अग्रवाल आणि मोहम्मद शमी यांना सामन्यानंतर IPL20.com च्या कार्यक्रमात सांगितलं. तो म्हणाला, ‘ जेव्हा आम्ही दुसरी सुपर ओव्हर खेळायला जात होतो तेव्हा ‘पहिल्या चेंडूचा सामना कोण करणार’  असं मयंकनी मला विचारलं तेव्हा मला आश्चर्यच वाटलं की तो असा प्रश्न विचारतोय. पहिल्या चेंडूचा सामना कायम बॉसच करणार,’ असही क्रिस गेलने सांगितलं. गेलला युनिव्हर्सल बॉस म्हटलं जातं. पंजाबकडून शमीने पहिली सुपर ओव्हर टाकताना चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर क्रिस जॉर्डनने दुसऱ्या डावात 11धावा दिल्या. ‘माझ्या दृष्टिनी शमी मॅन ऑफ द मॅच होता. रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉकसारख्या फलंदाजांना सहा धावा करू न देणं हे प्रचंड कठीण काम शमीनी करून दाखवलं. मी नेट्समध्ये शमीसोबत सराव केला आहे, त्याचे यॉर्कर अवघड असतात आणि त्याच बळावर त्यानी मला आम्हाला विजय मिळवून दिला." असंही गेल पुढे म्हणाला. हे ही वाचा-ठरलं! 'या' दोन संघांमध्ये होणार IPL फायनल, युवीच्या भविष्यवाणीनं घाबरली RCB जेव्हा आपल्याला सुपर ओव्हरमध्ये बचाव करण्यासाठी 15 ते 16 धावा मिळतात. तेव्हा ही पूर्णपणे वेगळी गोष्ट असते. आपण आपल्या स्वतःचे विश्वास ठेवतो आणि आपल्याला माहीत असतं की आपण ते करू शकतो. परंतु इतक्या कमी धावा असतात तेव्हा वेगळीच एकाग्रता लागते. मला माझ्यावर खूप विश्वास होता. दरवेळी रनअप घेताना मी मनात म्हणत होतो, ‘ आताचा चेंडू उत्तम पडला. पुढचाही उत्तमच पडणार आहे,’ असंही शमी पुढे म्हणाला. एमआयविरुद्ध दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करताना मनात काय विचार होते असं विचारल्यावर मयंक अग्रवाल म्हणाला, ‘मी चौकार मारायचे असंच ठरवून आलो होतो. पण गेल म्हणाला मयंक फक्त बॉलवर लक्ष दे. त्याचा सल्ला मानून मी फक्त चौकार ठोकण्याचाच निश्चय केला. एक-दोन धावा काढण्याचा माझा विचारच नव्हता. मी ठरवलं चौकार मारयचं आणि सुदैवानी ते सत्यात उतरलं.’
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या