31 मार्च : विराट कोहली हा नेहमीच त्याच्या खेळाला घेऊन चर्चेत राहिला आहे. परंतु त्यापेक्षा अधिक विराट हा त्याच्या भांडणांना घेऊन सगळ्याच्या नजरेत राहिला आहे. असंच काही तरी त्यावेळी सुद्धा घडलं.
विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर एड कोवन या दोघांमध्ये घडलेला वाद सुद्धा असाच काही रंगला. एड कोवनने एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की, विराटने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन, मला इतका संताप झाला होता की विराटला स्टंप उखडून मारायचा विचार मनात आला होता.
भारताने नुकत्याच झालेल्या सिरिजमध्ये ऑस्ट्रेलियाला 2-1 ने मात दिल्याने भारत आणि ऑस्ट्रेलियामधील वातावरण खूप प्रमाणात गरम झाले होते. याच सिरिजमध्ये अनेक असे वादाचे प्रसंगसमोर आले, ज्यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ हे दोघे सगळयाच्या नजरेत बसले.
फॉक्स स्पोर्ट्सने एड कोवनच्या वतीने केलेल्या वक्तव्यामध्ये असे सांगितलं की, सिरिजच्या दरम्यान माझ्या आईची तब्येत खराब होती, आणि त्याच वेळी विराटने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन माझी आणि विराटमध्ये खूप जुंपली. अशा काही वैयक्तिक गोष्टी असतात ज्या मीडिया समोर घेऊन येणं, काही प्रमाणात संवेदनशील असतात. परंतु विराटला त्याची चूक तो पर्यंत समजली नाही, जो पर्यंत अंपायरने येऊन त्याला सांगितलं की, ही तुझी चूक आहे. त्यानंतर विराटने माझी माफी मागतली.