मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'मला वनडे टीमचा कॅप्टन राहायचं होतं पण...' विराटने बोलून दाखवलं मनातलं दु:ख

'मला वनडे टीमचा कॅप्टन राहायचं होतं पण...' विराटने बोलून दाखवलं मनातलं दु:ख

Virat Kohli

Virat Kohli

भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये विराटने कॅप्टन्सीच्या वादावर भाष्य केलं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 15 डिसेंबर : भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये विराटने कॅप्टन्सीच्या वादावर भाष्य केलं. मला वनडे टीमचा कॅप्टन म्हणून कायम राहायचं होतं, तसंच आपण दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे सीरिजसाठी (India tour of South Africa) उपलब्ध असल्याचंही विराट म्हणाला. वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर विराट कोहलीची ही पहिलीच पत्रकार परिषद होती.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा व्हायच्या दीड तास आधी मला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, असं विराट म्हणाला. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडण्याआधी आपण बीसीसीआयला याबाबत माहिती दिली, पण याबाबत बीसीसीआयसोबत काहीच बोलणं झालं नाही, असा दावा विराटने केला. विराटच्या या दाव्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबाबत (Sourav Ganguly) प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विराट कोहलीला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं होतं, पण त्याने नकार दिल्याचं गांगुली म्हणाला होता. गांगुलीचा हा दावाच विराटने फेटाळून लावला आहे.

'मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे सीरिजमध्ये खेळण्यासाठी तयार आहे. माझ्याबद्दल ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, त्या चुकीच्या आहेत. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर मी सगळ्यात आधी बीसीसीआयला सांगितलं, यात काहीच चूक नव्हती. सगळ्यांनी हे योग्य पद्धतीने घेतलं आणि माझ्या निर्णयाचं स्वागत केलं. तसंच तू योग्य मार्गावर आहेस, असंही सांगितलं,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

'मला वनडे आणि टेस्ट टीमचं कॅप्टन राहायचं आहे, असं निवड समितीला सांगितलं, पण निवड समिती किंवा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी काही निर्णय घेतला, तर मी त्यासाठी तयार आहे. निवड समितीने जो निर्णय घेतला तो समोर आहे. निवड समिती आणि बोर्ड अधिकाऱ्यांची इच्छा असेल तर मी कर्णधार राहण्यासाठी तयार असल्याचं मी सांगितलं,' असं वक्तव्य विराटने केलं.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 3 टेस्ट मॅचच्या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिली टेस्ट सेन्च्युरियनमध्ये 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दुसरी टेस्ट 3 जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये आणि तिसरी टेस्ट 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये होईल. यानंतर दोन्ही देशांमध्ये 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे.

First published:

Tags: Team india, Virat kohli