Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनीबाबत काय घेणार निर्णय? गांगुली म्हणाला त्याला विचारणार की...

धोनीबाबत काय घेणार निर्णय? गांगुली म्हणाला त्याला विचारणार की...

बीसीसीआय़च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सौरव गांगुली 23 ऑक्टोंबरला सूत्रे हाती घेईल. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यापूर्वी तो निवड समितीशी चर्चा करणार आहे.

बीसीसीआय़च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सौरव गांगुली 23 ऑक्टोंबरला सूत्रे हाती घेईल. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यापूर्वी तो निवड समितीशी चर्चा करणार आहे.

बीसीसीआय़च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सौरव गांगुली 23 ऑक्टोंबरला सूत्रे हाती घेईल. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यापूर्वी तो निवड समितीशी चर्चा करणार आहे.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 17 ऑक्टोबर : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआय़च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. 23 ऑक्टोबरला याबाबतीच अधिकृत घोषणा करण्यात येईल. बुधवारी गांगुलीने महेंद्रसिंग धोनीबद्दल निवड समितीशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. 24 ऑक्टोबरला निवड समितीशी बैठकीत त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर माझं मत सांगेन असं गांगुलीने स्पष्ट केलं. बैठकीनंतर बांगलादेशसाठी टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.

सौरव गांगुलीने बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात पत्रकारांशी चर्चा केली. त्यावेळी तो म्हणाला की, निवड समिती धोनीबाबत काय विचार करत आहे हे जाणून घ्यायचं आहे. त्यानंतरच मी माझं म्हणणं सांगेन. तसेच, धोनीचा काय विचार आहे हे देखील बघावं लागेल. मला त्याला विचारायचं आहे की त्याला काय हवं आहे आणि काय नको?

धोनीने वर्ल्ड कपनंतर इतका मोठा ब्रेक घेतला त्याबद्दल विचारले असता गांगुली म्हणाला की, मी त्यावेळी नव्हतो. आता माझी निवड समितीसोबत पहिली बैठक होणार आहे. तेव्हा चर्चा होईल. बीसीसीआय़चा अध्यक्ष झाल्यानंतर गांगुली भारतीय कर्णधार विराट कोहलीलासुद्धा 24 ऑक्टोबरला भेटणार आहे.

याआधीही सौरव गांगुलीने धोनीच्या भविष्याबद्दल मत व्यक्त केलं होतं. तेव्हा विराट कोहली आणि निवड समितीनं निर्णय घ्यायला हवा असं म्हटलं होतं. गांगुली म्हणाला होता की , त्याला माहिती नाही कि निवड समिती काय विचार करते, विराटचं म्हणणं काय आहे. मात्र, ते या प्रक्रियेतील महत्वाचे घटक आहेत त्यांना निर्णय घेऊ दे. आता बीसीसीआय़च्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सौरव गांगुली धोनीबद्दल काय निर्णय घेणार य़ाचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

बांगलादेश विरुद्धची मालिकेसाठी भारतीय संघाची निवड 21 ऑक्टोबरला होणार होती. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येत असून 3 टी20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

वर्ल्ड कपनंतर भारताचा धोनीच्या निवृत्तीची चर्चा सातत्यानं होत आहे. धोनीने निवृत्ती घेतलेली नाही आणि तो विंडीज, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही खेळत नाही मग तो 2020 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचा कसा असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान अनेक दिग्गजांनी धोनीने त्याच्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यायला हवा. त्याबद्दल धोनीने कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीशी चर्चा करायला हवं असं म्हटलं होतं.

वाचा : कॅप्टन कुलला राग येतो तेव्हा...,धोनीनं स्वत: सांगितला किस्सा

वर्ल़्ड कपमधील पराभवानंतर धोनी देशात परतल्यावर निवृत्ती घेईल असं म्हटलं जात होतं. मात्र, त्यानंतर धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेत लष्करी प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर तो शूटिंगमध्ये व्यग्र आहे. विंडीज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याचं नाव संघात नसल्यानं अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

वाचा : विराटचा पत्ता लवकरच होणार कट? ‘या’ कारणामुळे रोहित होऊ शकतो नवा कर्णधार

VIDEO : '... म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस', मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट

First published:

Tags: BCCI, MS Dhoni, Sourav ganguly